राजीव गांधी चौकात दुभाजकाची स्वच्छता
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
लातुर:-ग्रीन लातूर वृक्ष टीम ने मागील तीन दिवसांपासून शहरातील दुभाजकाची स्वच्छता करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यात रविवारी व सोमवारी मुख्य रस्त्यावरील चितिकरण हॉटेल ते लोकमान्य टिळक चौकापर्यंत चे दुभाजक स्वच्छ करून अंदाजे ३ ट्रक्टर केरकचरा, घाण काढून दुभाजक स्वच्छ केले. आज मंगळवारी राजीव गांधी चौक ते लाईफ स्टाईल इमारत समोरील दुभाजक स्वच्छ करून अंदाजे २ ट्रॅक्टर केरकचरा, घाण बाहेर काढली, दुभाजकातील झाडांना आळे केले.
दुभाजक स्वच्छता मोहिमेसाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, ऍड वैशाली यादव, दीपाली राजपूत, पूजा पाटील, मनीषा कोकणे, पदमाकर बागल, राहुल माने, दयाराम सुडे, आकाश सावंत, अभिषेक घाडगे, विजय मोहिते, भास्करराव बोरगावकर, अविनाश मंत्री, अरविंद फड, नागसेन कांबळे, सिताराम कंजे, कांत मरकड शुभम आवाड, महेश गेलडा राजमाने यांनी परिश्रम घेतले.
शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, घंटा गाडी व्यवस्था सुनियोजित करावी., दुकानदारांकडे कचरा पेट्या आहेत की नाही याची पडताळणी करावी, शहर विद्रुपीकरण करणाऱ्या वर कारवाई करावी., मनपाकडे मनुष्यबळ कमी असेल तर अतिरिक्त मनुष्यबळ करिता सरकार कडे मागणी करावी अशी सूचना डॉ. पवन लड्डा यांनी केली आहे.