यशवंत विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ
लातूर – यशवंत नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यशवंत विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ (दि.७) रोजी ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आला.
११ फेब्रुवारी रोजी लातूर येथील यशवंत नागरी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून. या बॅंकेच्या निवडणुकीसाठी यशवंत विकास पॅनेलच्या रुपाने पॅनल प्रमुख विष्णूपंत साठे व पॅनल संघटक सुहास पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची उभारणी करण्यात आली असून.१३ संचालकासाठी हि निवडणूक पार पडणार आहे. यशवंत विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी आपल्या यशवंत नागरी सहकारी बँकेच्या भरभराटीसाठी छत्री या चिन्हावर शिक्का मारुन यशवंत विकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व १३ उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे. पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करुन बँकेच्या भरभराटीचे नवनवे शिखर पादाक्रांत करण्याचा आमचा मानस आहे,बॅंकेच्या सभासदाच्या हितासाठी मतरुपी आशीर्वाद देऊन यशवंत पॅनेलच्या उमेदवारांना सेवेची संधी द्या.असे आवाहन पॅनल प्रमुख विष्णूपंत साठे व संघटक सुहास पाचपुते यांच्याकडून करण्यात आले.या निवडणुकीत यशवंत विकास पॅनलला अपक्ष उमेदवार धनंजय साठे, गफार घावटी, सौ. सुरेखा तवरे, अॅड महेश माने, विनोद गुंडरे, ललितकुमार शर्मा, राजगोपाल सारडा, विकास चामे, सिताराम पवार गोविंद हालसे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून या निवडणुकीत यशवंत विकास पॅनेलच्या रुपाने एकच पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून आपला विजयी निश्चित असल्याचा विश्वास या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी पॅनल प्रमुख व संघटकांनी व्यक्त केला आहे.
या प्रचार शुभारंभ प्रसंगी प्रा. राजकुमार जाधव, सुर्यभान पाटील, राजेंद्र कोळगे, अॅड सुनील शिंदे, अॅड राहूल विहिरे, चंद्रकांत साळुंके, सुरेश राठोड,अॅड अदिमाया गवारे, सौ. सुजाता कदम, अॅड उदय गवारे आदी उपस्थित होते