नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या कार्यकाळात
यशस्वी व्यावसायिक उद्योजक बनतील असे प्रयत्न करावेत
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या चेअरमनपदी किरण जाधव व
व्हा. चेअरमनपदी समद पटेल यांची निवड झाल्याबद्दल
अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
लातूर( प्रतिनिधी) : विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव यांची तर उपाध्यक्षपदी समद पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांनी संचालक मंडळांसह राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन मिळालेल्या संधीबद्दल आभार मानले, यावेळी उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या कार्यकाळात, सर्व स्तरातील गरजू तरुण मंडळींना वेळेत कर्ज उपलब्ध होऊन ते यशस्वी व्यावसायिक उद्योजक बनतील त्याचबरोबर बँकेचा महाराष्ट्रस्तरावर विस्तार वाढेल असा विश्वास माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व्यक्त केला. यावेळी विलास को-ऑपरेटिव बँकेचे संचालक सर्वश्री अनिल बाबाराव शिंदे, सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे, व्यकंटेश विश्वाभरराव पुरी, विजय गोविंदराव देशमुख, अरूण लक्ष्मणराव कामदार, अजय ललीतकूमार शहा, डॉ. कल्याण बलभीम बरमदे, उस्ताद सलीम ताज्जमूलहूसेन, प्रा.स्मिता कैलास खानापूरे, डॉ.प्रा.जयदेवी पांडूरंग कोळगे, चंद्रकांत लिंबराज धायगूडे, सुनिल नामदेवराव पडीले, पंडीत कोडींबा कावळे आदी उपस्थित होते.