महात्मा बसवेश्वरांच्या विचारांच्या प्रसारासाठी सर्व माध्यमांचा वापर करावा ः प्रा.सुदर्शनराव बिरादार
निलंगा ः बाराव्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करायचा असेल तर सर्व माध्यमांचा वापर करावा लागेल असे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी निलंगा येथे लिंगायत महासंघाच्यावतीने संगन्नबसव मठात आयोजित समग्र महात्मा बसवेश्वर ग्रंथ वितरण सोहळ्यात बोलताना प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले बाराव्या शतकातील महान समाजसुधारक असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे अनेक क्षेत्रात खुप मोलाचे कार्य आहे. जगातल्या विचारवंताच्या पंक्तीत सर्वात वरचे त्यांचे स्थान आहे. त्यांनी सांगितलेले कायक, दासोह, इष्टलिंगाचे महत्वही खूप मोलाचे असून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा लागेल. त्याचाच भाग म्हणून समग्र महात्मा बसवेश्वर या ग्रंथाची निर्मिती मी केली आहे. देशपातळीवर महात्मा बसवेश्वरांचा प्रसार करणारी, संशोधन करणारी, माहिती देणारी बसव मिशन संस्था असायला पाहिजे. तसेच बसव विचारावर चालणारे लोक दिसले पाहिजेत तरच त्याचे अनुकरण होईल. त्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे.
समग्र महात्मा बसवेश्वर या ग्रंथाच्या 108 प्रतीच्या मोफत वितरण सोहळा कार्यक्रमासाठी निलंगा येथील विरक्त मठाचे संगन्नबसवण्ण महास्वामी तसेच प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ.एम.एस.दडगे, डॉ.श्रीधर अहंकारी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, प्रा.डॉ.गजेंद्र तरंगे, पंचायत समिती सदस्य गोकार्णा पाटील, डॉ.अरविंद भातांब्रे, डॉ.विक्रम कुडूंबले, कमलाकर डोके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, लातूर शहर सरचिटणीस लिंगेश्वर बिरादार, देवणी शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले, पृथ्वीराज जीवणे तसेच शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे आदिंची उपस्थिती होती. यावेळी 128 जणांना मोफत ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, सरचिटणीस अशोक काडादी, शहराध्यक्ष डॉ.मन्मथ गताटे, एन.आर.स्वामी, एम.एम.बिरादार, सुर्यकांतअप्पा पत्रे, नागनाथप्पा निला, नागनाथ स्वामी, राजप्पा वारद, दिलीप रंडाळे, गदगेअप्पा भुसनूरे, दत्ता कल्लप्पा बिरादार, शिवाप्पा भुरके, रामेश्वर तेली, विलास व्होनाळे, अप्पासाहेब बिरादार, बुध्दीवंत मुळे, करीबसवेश्वर पाटील, रत्नेश्वर गताटे, श्रीकांत आष्टुरे, अमर मुगावे, बसवराज बसपूरे तसेच लिंगायत महासंघाच्या महिला अध्यक्षा सौ.संगीता गडवंते, उपाध्यक्ष वैशाली व्होनाळे, सचिव गुणवंती गताटे आदिंनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार किशन कोलते यांनी मानले