माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
लातूर शहरातील प्रभाग १ मधील विविध विकास कामांची केली पाहणीस्थानिक नागरिकांशी साधला संवाद
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी लातूर शहरातील प्रभाग १ मधील सिद्धेश्वर चौक परिसरातील दलित वस्ती सुधार योजनेतून बांधण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची व रमाई आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी करून संबंधितांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या, तसेच आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित स्थानिक नागरकांची चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव गोरोबा लोखंडे, समद पटेल, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, प्रभाग १ चे अध्यक्ष दगडूआप्पा मिटकरी, नेताजी बादाडे, चंद्रकांत धायगुडे, इम्रान सय्यद, रविशंकर जाधव, आयुब मणियार, आरिफ शेख, जहीर शेख, विजय गायकवाड, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, पप्पू देशमुख, किरण बनसोडे, प्रमोद जोशी, बालाजी कांबळे, राजू नगर, आकाश मगर, बळी मिसाळ, अशोक कांबळे, वीरेंद्र सौताडेकर, शशिकांत वेदपाठक, दिलीप गायकवाड, किसन शिंदे, मनोज लोखंडे, युनूस शेख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग १ मधील सर्व बूथ प्रमुख नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गोरोबा लोखंडे यांच्या निवासस्थानी भेट माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील सिद्धेश्वरचौक परिसरातील रत्नापूर चौक येथे जाऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिवगोरोबा लोखंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन लोखंड कुटुंबीय,मित्रपरिवार, त्या परिसरातील नागरिक यांच्याशी चर्चा केली. गावभागातीलअडचणी समजून घेतल्या, त्या सोडवण्यासंदर्भात संबंधितांना सूचनाही केल्याआहेत. यावेळी शिवाजी लोखंडे, लोखंडे कुटुंबीय मित्रपरिवारउपस्थित होते.
—-