• Wed. Apr 30th, 2025

राज्यातील बुद्धिजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने हे विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे- l माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Feb 4, 2023

राज्यातील बुद्धिजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने
हे विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे

काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे,
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

लातूर प्रतिनिधी :
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधान परिषद  निवडणुकीतून बुद्धीजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेकाँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी  जोमाने लागावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर काँग्रेस भवन येथे, पक्षाच्या विविध सेलचे अध्यक्ष आणि नवनियुक्त प्रभाग अध्यक्ष यांच्या संयुक्त आढावा बैठकीदरम्यान बोलताना केले आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रभाग अध्यक्ष तसेच विविध विभाग अध्यक्षांची संयुक्त बैठक घेऊन एकूण कामकाजाचा आढावा घेतला. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्वांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे शहरातील प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा कार्यक्रम आणि विचार पोहोचवावा जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी कार्यवाही करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. स्मिता खानापुरे, लातूर शहर अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष फारुक शेख, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, लातूर शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, लातूर शहर ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर बर्डे, लातूर शहर काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, लातूर शहर काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष इसरार सगरे, विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सागावे, प्रभाग १ चे काँग्रेसचे अध्यक्ष दगडूआप्पा मिटकरी, प्रभाग २ अध्यक्ष  निजाम शेख, प्रभाग ३ अध्यक्ष विकास कांबळे, प्रभाग ४ अध्यक्ष आसिफ बागवान, प्रभाग ५ अध्यक्ष खाजामीया शेख, प्रभाग ६ चे अध्यक्ष गिरीश ब्याळे, प्रभाग ७ अध्यक्ष सुनीत खंडागळे, प्रभाग ८  चे अध्यक्ष महेश कोळ, प्रभाग ९ चे अध्यक्ष अमर राजपूत, प्रभाग १० चे अध्यक्ष रत्नदीप अजनीकर, प्रभाग ११ चे अध्यक्ष विकास वाघमारे, प्रभाग १२ चे अध्यक्ष सूर्यकांत कातळे, प्रभाग १३ अध्यक्ष विजय गायकवाड, प्रभाग १४ चे अध्यक्ष धनंजय शेळके, प्रभाग १५ चे अध्यक्ष राजकुमार जाधव,प्रभाग १६ चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण नावंदर, प्रभाग १७  अध्यक्ष प्रवीण घोटाळे, प्रभाग १८ चे अध्यक्ष सुंदर पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विभागाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, देशात व राज्यातील वातावरण आपणा सर्वांना माहिती आहे. प्रभाग अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आहे, पक्षाच्या कोणत्याही अध्यक्षाला अनन्यसाधारण महत्व असते. प्रभाग अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष एक साखळी आहे पक्षाला दिशा देण्याचे पक्ष तळागाळात मजबूत करण्याचे हे पद आहे. पक्ष बांधणी करणे काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवणे हे प्रभाग अध्यक्षांचे काम आहे. त्यांनी प्रभागात बूथ कमिटी, प्रभाग कमिटी तयार करावी, लवकरच आपण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले  यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेणार आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक प्रभागात काँग्रेस भवनची एक शाखा तयार करावी, तेथेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सूटतील, तसेच त्या ठिकाणी केंद्र राज्याच्या शासकीय योजनाची माहिती ही त्या कार्यालयात असावा, विधान परिषदेच्या लागलेल्या निकालातून बुद्धीजीवी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे, ही बदलती हवा आहे. मनपा, विधानसभा, लोकसभा निवडणुका या लागोपाठ येतील. लातूर शहर जिल्हा काँग्रेसने एनएसयुआय, ग्राहक संघटना, घरेलू कामगार संघटना यांच्या नेमणुका केलेल्या नाहीत, त्या कराव्यात. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतत दक्ष राहिले पाहिजे, सामाजिक प्रश्न आंदोलने करून सोडवली पाहिजेत, तसेच महिना व पंधरा दिवसाला पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत, त्यात राष्ट्रीय ते गल्लीतील मुद्द्यावर सुद्धा चर्चा केली पाहिजे सर्व फ्रंटल अध्यक्षांनी ही प्रभागात जाऊन काम करावे असे सांगून त्यांनी नवनियुक्त काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रभाग अध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीचे प्रास्ताविक लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी करून लातूर शहर काँग्रेस कमीटी लातूर शहरात राबवत असलेल्या उपक्रमाची व केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. प्रभाग १ चे अध्यक्ष दगडूआप्पा मिटकरी प्रभाग ४ चे अध्यक्ष आसिफ बागवान, प्रभाग १३ चे अध्यक्ष विजय गायकवाड आदी प्रभाग अध्यक्षांनी केलेल्या कामाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर जिल्हा सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर  काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष इसरार सगरे यांनी मानले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या अभिनंदनाचा ठराव

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत  महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली, त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी मांडला, त्यास लातूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा. स्मिता खानापुरे यांनी अनुमोदन दिले.भारत जोडो यात्रेचे हिंगोली जिल्ह्यातील नियोजन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले या नियोजनचे कौतुक काश्मीर पर्यंत झाले, यात्रेच्या महाद्वाराची पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या फेसबुक वरून केली. लातूर जिल्ह्याच्या वतीने आमदार अमित विलासराव देशमुखयांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले, त्याची नोंद देशपातळीवर घेण्यात आली याबद्दल आमदार अमित देशमुख यांच्याअभिनंदनाचा ठराव लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी मांडला त्यास अनुमोदन लातूर शहर काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed