• Tue. Apr 29th, 2025

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपपरिसरात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर उत्साहात

Byjantaadmin

Feb 2, 2023

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपपरिसरात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर उत्साहात

लातूर, दि. 02 (जिमाका) : येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसरात ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर’ यशस्वीरित्या पार पडले. उपपरिसर संचालक डॉ. राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरामध्ये एनडीआरएमच्या पाचव्या बटालियनचे सिनियर इन्स्पेक्टर प्रमोद राय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, उपनिरीक्षक बिभीषण मोरे उपस्थित होते.

भाजणे, हाता-पायाला आणि डोक्याला दुखापत झाल्यास, साप चावल्यास, इलेक्ट्रिक शॉक लागल्यास करावयाच्या प्राथमिक उपचाराविषयी श्री. मोरे यांनी विस्तृत माहिती दिली. तसेच जखमी व्यक्तीस सीपीआर देणे आणिअग्निशमनबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. लातूर परिसरात अनुभवलेल्या नैसर्गिक आपत्तीविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या जवानांनी उपपरिसराच्या बहुमजली इमारतीवरून जखमी व्यक्तींना दोरीच्या सहाय्याने वाचविण्याचे चित्तथरारक प्रात्येक्षिक सादर केले. एनडीआरएफच्या टीममार्फत शोध व बचाव कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यांचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यापीठ उपपरिसरातील शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed