• Tue. Apr 29th, 2025

लातूर जिल्ह्यात 11 फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Byjantaadmin

Feb 1, 2023

लातूर जिल्ह्यात 11 फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

लातूर, (जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार लातूर मुख्यालयी तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर आणि सचिव श्रीमती एस.डी. अवसेकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लातूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, 138 एन. आय. अॅक्टची, बँकेची कर्ज वसुली, मोटार वाहन कायदा, कौटुंबिक वाद, इलेक्ट्रिसिटी अॅक्ट समझोता, भूसंपादन, कामगार, सहकार न्यायालय, वीज व पाणी बिल, पगार व भत्ते आणि सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे, महसूल, कामगार वाद, दूरध्वनी तथा मोबाईल कंपन्यांची प्रकरणे तसेच न्यायालयात दाखलपूर्व प्रकरणे अशा सर्व प्रकारची तडजोडयोग्य प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

पक्षकारांनी आपापसात सामजस्याने ही प्रकरणे सोडवावीत. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे या लोक अदालतीमध्ये ठेवायचा असतील, त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed