• Tue. Apr 29th, 2025

खासगी रोपवाटिका परवान्यासाठी कृषि विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन ; अनधिकृत रोपवाटिकांवर होणार कारवाई

Byjantaadmin

Feb 1, 2023

खासगी रोपवाटिका परवान्यासाठी कृषि विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

•अनधिकृत रोपवाटिकांवर होणार कारवाई

लातूर, (जिमाका) : जिल्ह्यात रस्त्यावरील अनधिकृत खासगी रोपवाटिकाकांवर नियंत्रण राखण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना रोगमुक्त व उच्च दर्जाची निरोगी फळपिकांची कलमे, रोपे उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागामार्फत फळरोपवाटिका घेऊ इच्छिणाऱ्या किंवा रोपमळे चालविणाऱ्या रोपवाटीकाधारकास महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, 1969 अंतर्गत रितसर परवाना देण्यात येतो. तरी इच्छुकांनी या परवान्यासाठी कृषि विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोपवाटिका परवान्यासाठी अहमदपूर, चाकूर, उदगीर, जळकोट व देवणी या तालुक्यासाठी उदगीर उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे, तसेच लातूर, औसा, निलंगा, रेणापूर व शिरूर अनंतपाळ या तालुक्यासाठी लातूर उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज सादर करावेत. फळरोप कलमे, रोपे विक्रीसाठी फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, 1969 अंतर्गत फळरोपवाटिका परवाना असणे बंधनकारक आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावरील अनधिकृत खाजगी रोपवाटिकामधून फळरोपांचे खुलेआम विक्री सुरु आसल्याचे दिसून येत आहे. अशी विक्री करणे फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियमाचे उल्लंघन आहे व विनापरवाना विक्री केल्यास रोपमळे अधिनियम कायद्यांतर्गत कायदेशिर कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे सर्व रोपवाटिकाधारकांनी फळरोपवाटिकांचा रितसर परवाना घेवूनच कलमे, रोपे विक्री करावी. अन्यथा आपल्या रोपवाटीकेवर रोपमळे अधिनियम कायद्यांतर्गत कायदेशिर कार्यवाही केली जार्हल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed