• Tue. Apr 29th, 2025

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदान केंद्रांना भेट

Byjantaadmin

Jan 30, 2023

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदान केंद्रांना भेट
लातूर/प्रतिनिधी :- औरंगाबाद (मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सोमवार दि. 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूकीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने प्रा. किरण पाटील निवडणूक लढवीत आहेत. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच मतदान केंद्रावर थांबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी सुचना केल्या.
औरंगाबाद(मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडत असून भाजपा महायुतीच्या वतीने प्रा. किरण पाटील निवडणूक लढवीत आहेत. या निवडणूकीसाठी संपुर्ण मराठवाड्यात आज दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झालेली आहे. लातूर जिल्ह्यातही ही मतदान प्रक्रिया पार पडत असून भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्यासाठी विविध मतदान केंद्रावर भाजपाच्या वतीने निवडणूक यंत्रणा राबविण्यात आलेली आहे. लातूर शहरातील बुथ क्र. 124, 125, 126 व 127 या चार मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडत होती. या मतदान केंद्रांना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेटी दिल्या. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, सरचिटणीस अ‍ॅड. दिग्वीजय काथवटे, महिला जिल्हाध्यक्षा मिना भोसले आदींची उपस्थिती होती.
मतदान केंद्राबाहेर भाजपाच्या वतीने मतदारांच्या सहकार्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर आ. निलंगेकर यांनी कांही वेळ बसून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. तसेच यादरम्यान आलेल्या मतदारांना त्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या निवडणूकीच्या माध्यमातून होणारे मतदान अधिकाधिक म्हणजे शंभर टक्के पुर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचनाही दिल्या. यावेळी शहर निवडणुक संयोजक रमेश बडगिरे, सरचिटणीस प्रविण सावंत, शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदिप मोरे, मनोज सुर्यवंशी, मंडल अध्यक्ष रवि सुडे, संजय गिर, विशाल हवा (पाटील), अनिल पंतगे, मुन्ना हाश्मी, प्रा. मारुती सुर्यवंशी आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed