विधन परिषदेच्या 2 पदवीधर व 3 शिक्षक अशा एकूण 5 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या निवडणुकीत प्रथमच भाजप व महाविकास आघाडीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठवाड्यात 227 मतदान केंद्रावर मतदान
औरंगाबादमध्ये शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी सकाळी आठ वाजताच औरंगाबाद तहसील कार्यालयात मतदान केले. औरंगाबाद जिल्ह्यात 53 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तर, मराठवाड्यात 227 मतदान केंद्रावर 61 हजार मतदार मतदान करणार आहेत. शिक्षकांनी मतदान करताना पुरेपूर काळजी घ्यावी आणि मतदान बाद होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन भाजप उमेदवार किरण पाटील यांनी केले आहे.
लातूर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतदार
मराठवाड्यात शिक्षक मतदार संघासाठी सकाळी आठ वाजताच मतदानाला सुरुवात झाली आहे. शिक्षकांनी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर येण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यात 61 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये औरंगाबाद लातूर आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहे.
भाजप, महाविकास आघाडीची आज शिक्षक अन् पदवीधरांसमाेर परीक्षा, 2 फेब्रुवारी राेजी मत ‘परीक्षे’चा निकाल