• Wed. Apr 30th, 2025

अभियंते जेंव्हा कविता.. मराठी अभिवाचन करतात..!

Byjantaadmin

Jan 28, 2023

अभियंते जेंव्हा कविता.. मराठी अभिवाचन करतात..!

  • सार्वजनिक बांधकाम विभागजलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाचा अनोखा उपक्रम

लातूर, (जिमाका) : ‘माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके’ एवढा अमाप गोडवा असणाऱ्या माय मराठीचे आपण सगळे शिलेदार. सध्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरु आहे. यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रम सुरु आहेत. पण लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा आणि मृदा व जलसंधारण या तीन विभागांच्यावतीने 26 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रम हे मराठी भाषेची गोडी लावणारे, संवर्धन करणारे, लिहिते करणारे होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित या कार्यक्रमांमध्ये अधीक्षक अभियंता ते लीपिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला. शीघ्र कविता, प्रसिद्ध साहित्यिकाच्या कथा कादंबरी, नाटक याच्या उताऱ्याचे अभिवाचन, मराठी शुद्धलेखन, वादविवाद स्पर्धा, मोबाईलचे मनोगत असे एकाहून एक सुंदर कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते.

सगळे कार्यक्रम अत्यंत दर्जेदार, भाषेतले सौंदर्य स्थळे याच्यासह अभिनयाचा समावेश असणारे होते. असे निखळ कार्यक्रम भाषेची अभिरुची वाढविणारे ठरतात. या कार्यक्रमांच्या आयोजनाचे श्रेय जातं ते मराठी भाषेतील उत्तम लेखक आणि लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, दुसरे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक अभिजित म्हेत्रे यांना. या दोन अधिकाऱ्यांमुळे सध्या लातूर विभागातील सर्व अभियंते वाचनाकडे वळतायत हे अत्यंत उत्साहवर्धक चित्र आहे.

मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत सर्व स्पर्धा बांधकाम भवन येथील सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यलेखन, युनिकोड लिपी टंकलेखन स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा, ‘माझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना’ याबाबत तीन ते पाच मिनिटे बोलणे, ‘शालेय शिक्षण मराठीतून की इंग्रजीतून’ या विषयावर वादविवाद स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed