शाखा अभियंता. ए.आर. मोजन यांचा भव्य सत्कार
निलंगा/प्रतिनिधी :निलंगा पंचायत समितीचे शाखा अभियंता ए.आर. मोजन यांचा निलंगा येथील पंचायत समिती सभागृहात भव्य सत्कार करण्यात आला शाखा अभियंता मोजन हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी अभियंता मोजन यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर केला त्यांच्या पुरस्काराबद्दल निलंगा पंचायत समितीला एक उत्कृष्ट बहुमान मिळाल्याबद्दल निलंगा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा अभियंता मोजन यांचा निलंगा पंचायत समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाला उपकार्यकारी अभियंता फुटाणे, शाखा अभियंता. बी. डी. चव्हाण शाखा अभियंता चिंचोलकर . शाखा अभियंता नरहरे, अभियंता बलभीम सूर्यवंशी, अभियंता राठोड कृषी अधिकारी पंचायती विभाग विशाल ढाकणे कक्षाधिकारी कदम वरिष्ठ सहाय्यक दत्तात्रय खटके इत्यादी सह पंचायत समितीतील सर्व विभागातील कर्मचारी या सत्कार समारंभाला उपस्थित होते.
शाखाअभियंता मौजन यांचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल निलंगा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ सहाय्यक दत्तात्रय खटके यांनी मानले.