• Wed. Apr 30th, 2025

प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायरा संपन्न

Byjantaadmin

Jan 27, 2023

मुंबई, : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा अकरावा अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रम संपन्न झाला.

राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, प्रधान सचिव विकास खारगे,  अनुपकुमार यांच्यासह इतर मान्यवर तसेच साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

सन 2013 पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिल्ली येथे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून गेटवे ऑफ इंडिया येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अखिल भारतीय मुशायऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

यावेळी मौलाना आझाद फायनान्शिअल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन, मुंबई यांच्या वतीने सर जे.जे. महानगर रक्तपेढीसाठी एक ॲम्बुलन्स भेट देण्यात आली. या ॲम्बुलन्सची चावी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात  कलीम समर, मदन मोहन दानिश, शारीख कैफी, रणजीत चौहान, हमीद इक्बाल सिद्धीकी, शाहीद लतिफ, कैसर खालिद, कमर सिद्धीकी, डॉ. जाकीर खान जाकीर, समीर सावंत,  डॉ. प्रज्ञा विकास, महशर फैजाबादी, नजर बिजनौरी, उबैद आझम आझमी असे नामवंत शायर सहभागी होवून  त्यांनी शायर उर्दू साहित्य, शेरोशायरीचे सादरीकरण केले. मुशायरा ऐकण्यासाठी रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतहर शकील यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed