करवंदी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
करवंदी , ता. उदगीर, येथे ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सोसयटी, पांडुरंग दूध संघ, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, बौध्द विहार मंदिर, येथे ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय करवंदी येथे सरपंच कौशल्या भाऊराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .त्या वेळी गावातील भालेराव जाधव, डॉ. दयानंद भा. जाधव , सुग्रीव सूर्यवंशी,गंगाधर बिरादार, विजयकुमार चव्हाण , परमेश्वर गायकवाड, विनायक गायकवाड , ज्ञानेश्वर जाधव, संकट सूर्यवंशी, संदीपान सूर्यवंशी, बाळासाहेब जाधव, अजित जाधव, वेंकटराव बिरादार, राम वाघे , काशिनाथ पाटील, शिवा गुणगुणे, संदीप जाधव , शालुबाई नरवटे, उपसरपंच शाहू चव्हाण, रमाबाई सुर्यवंशी, शंकर बिरादार, वसंत सुर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, आंगणवाडी शिक्षिका नांदेडकर, नरवटे, पूनम जाधव, मारोती नरवटे, रोहिदास गंभीरे,अनिल भातंब्रे, पद्मिन बाई वाघे,बाके,पापड सूर्यवंशी, लांडगे , आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गावकऱ्यांनी डॉ. दयानंद भाऊराव जाधव यांना इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधील सर्वोच्च पदवी, पीएच.डी. मिळाल्याबद्दल शाल , श्रीफळ , छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन भव्य सत्कार केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम ची तालीम, भाषणे आणि कवायती सादर केल्या . प्रोत्साहन पर वेगवेगळ्या खेळात प्रथम, येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले .शाळेतील विद्यार्थ्यांना, आणि गावातील जनतेसाठी या वेळी मोफत ब्लड ग्रुप तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी जि. प.प्राथमिक शाळा करवंदी चे मुख्याध्यापक एस.एल शेगसारे ,शिक्षक डी. व्ही.शिंदे,एल.व्ही.मोरे,डी. जी.तोंडारकर हे उपस्थित होते.