महाराष्ट्र महाविद्यालयाची सीमा कांबळे हिचीअखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा बंगलोर येथे निवड
निलंगा:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड क्रॉस कंट्री महिला व पुरुष स्पर्धेसाठी संघ प्रेसिडेन्सी विद्यापीठ, बेंगलोर येथे दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय अंतविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धा दहा किलोमीटर धावणे यासाठी महिला संघामध्ये महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील कांबळे सीमा दत्ता बी कॉम, तृतीय वर्ष, ही विद्यार्थिनीची विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगाचे अध्यक्ष माननीय विजय पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके,क्रीडा संचालक डॉ.गोपाळ मोघे उपस्थित होते,तसेच कोठा विद्यापीठ, राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय बॅडमिंटन आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा पांचाळ गौरव बीएससी तृतीय वर्ष हा विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत अविजीत राहीला.त्याबद्दल त्याचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला खेळाडूंना क्रीडा संचालक,प्रा. डॉ. गोपाळ मोघे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे