मोबाइल टावरचे सेल्टर रुमचे कुलुप तोडुन आतमधील बॅटरी चोरणाऱ्या चार अरोपीतांना अटक
कासार सिरसी:-मोबाईल इंडस टॉवरच्या बॅटरी चोरणारे चार आरोपी व त्यांनी चोरलेल्या २० बॅटऱ्या व गुन्हयात वापरलेले वाहन महींद्रा पिकअप बोलेरो, इंडीका कार व एक स्कुटी असा एकुण ११,६४,०००/- रु. चा मुददेमाल जप्त.
(कासार सिरसी पोलीस ठाणे यांची दमदार कामगिरी )
दि. २४/०१/२०२३ रोजी फिर्यादी महादेव पंडीत ढवण यांनी पोलीस ठाणे कासार सिरसी येथे येवून लेखी फिर्याद दिली की, दि. २२/०१/२०२३ रोजी रात्री २२.४८ वा. ते २३.५५ वा. चे दरम्यान इंडस टॉवर चिंचोली भंगार येथे अज्ञात आरोपीतांनी इंडस कंपनीचे टॉवरच्या सेल्टर रुमचे लॉक तोडुन आतमध्ये प्रवेश करुन आतमध्ये रॅकमधील ठेवलेल्या अमर राजा कंपनीच्या २० बॅटरी सेल असा एकुण १४,०००/- रु.चा मुददेमाल चोरटयाने चोरुन नेला आहे. वगैरे तक्रारी अर्जावरुन गुन्हा रजि. नं. २२/२०२३ कलम ३७९, ३४ भादंवि प्रमाणे दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / ९२ हिंगमीरे यांचकडे दिला.
मा. श्री सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातुर, मा. श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक लातुर, मा. श्री डॉ. दिनेशकुमार कोल्हे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग निलंगा यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन अटक करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनाप्रमाणे श्री रेवन्नाथ डमाळे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री गजानन क्षिरसागर पोलीस उपनिरीक्षक यांनी व त्याच्या स्टाफमधील पोलीस अंमलदार, स.फौ. महानवर, सफौ. चामे, पोहेकॉ / जाधव, पोहेकॉ / हिंगमीरे, पोहेकॉ / घोरपडे, पोहेकॉ / वरवटे, पोहेकॉ/तोरंबे, पोहेकॉ लवटे, पोहेकॉ / तपसे, पोना/ शेख, पोका /इंदापुरे, पोकॉ/गायकवाड, पोकॉ/मस्के, पोकॉ/मुल्ला, मपोका /सुनापे यांनी घटनास्थळी भेट देवुन फिर्यादीस विचारपुस करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे, तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे १. शैलेश श्रीमंत सुर्यवंशी वय २३ वर्ष व्यवसाय शिक्षण, रा. विदयानगर निलंगा, २. सुदाम तानाजी हजारे व्यवसाय शिक्षण, वय १८ वर्ष रा. बिबराळ ता. शिरुर अनंतपाळ, ३. भीम नागनाथ जाधव वय २६ वर्ष व्यवसाय जिम ट्रेनर, रा. शिवाजी नगर निलंगा, ४. ज्ञानेश्वर निवृत्ती शिंदे वय ५० वर्ष व्यवसाय भंगार विक्रेता रा. बोरसुरी ता. निलंगा यांना ताब्यात घेवुन विचारणा केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन चिंचोली भंगार येथील टॉवरच्या बॅट-या दोन वेळा चोरी केल्याचे सांगितले. तसेच उस्तुरी येथे दि. २१/०१/२०२३ रोजी, हासोरी येथे दि. १९/०१/२०२३ रोजी इंडस टॉवरचे सेल्टर रुमचे लॉक तोडुन आतमधील रॅकमध्ये ठेवलेल्या २४ बॅटऱ्या चोरी केल्या. त्यावरुन पोलीस ठाणे कासार सिरसी येथे दाखल गु.र.नं. ०२/२०२३ कलम ३७९,३४ भा.दं.वि.. गु.र.नं. १६/ २०२३ कलम ३७९, ३४ भा. दं. वि. गु.र.नं. २१ / २०२३ कलम ३७९,३४ भा.दं.वि., गु.र.नं.२२/२०२३ कलम ३७९, ३४ भा. दं. वि. प्रमाणे दाखल गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील गु.र.नं. २२/२०२३ मधील बॅटरी व गुन्हयातील एकुण मुददेमाल ११,६४,०००/- रु.चा गुन्हयात वापरलेले पिकअप बोलेरो, इंडिका कार व एक स्कुटी असा मुददेमाल हस्तगत केला असुन सदर अटक आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कामगिरीचे मा. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे कामगिरी बाबत त्यांचे कौतुक केले आहे.