• Wed. Apr 30th, 2025

राज्य संघटन समितीच्या सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची निवड

Byjantaadmin

Jan 24, 2023

अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाच्या राज्य संघटन समितीच्या सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची निवड

निलंगा-अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाच्या राज्य संघटन समिती सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पञाव्दारे अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाचे अध्यक्ष प्रमोद सोपानराव बागलाणे यांनी निवड केली आहे.
अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाचे अध्यक्ष प्रमोद सोपानराव बागलाणे यांनी सांगितले,प्रशांत साळुंके एक सामाजिक अभ्यासूवृृत्तीचा असल्याने त्यांची सदर नियुक्ती आपल्या कोअर कमिटीव्दारे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले त्यांना पुठील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
नवनियुक्त अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाच्या राज्य संघटन समितीच्या सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची नियुक्ती झाल्यानंतर बोलताना त्यांनी समाजाच्या संघटन बांधणी हाच यशाचा नवामंञ असल्याचे सांगितले तसेच मला ज्यांनी नियुक्ती दिली त्यांचा मी आभारी आहे यापुठे समाजासाठी संघटनात्मक बांधणी,दिशादर्शक आणि समाजोपयोगी काम करण्यासाठी मी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजातील कोअर कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर जवळकर,उपाध्यक्ष मनोज भिंड,कार्याध्यक्ष निखिल पाटोले,राजीव काकडे यांनी सांगताना, प्रशांत साळुंके एक होतकरू तरूण आपल्या संघटन कौशल्य वाढीसाठी त्यांच्याकडे पाहिले जाते म्हणून त्यांना राज्य संघटन समितीच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले.
या निवडीच्या अभिनंदनात विजय उबाळे,प्रविण भालेराव,अंबादास दिल्लीकर,ञ्यंबक सोनवळकर,राम सोनवळकर,भिकाजी वाघमारे,रामहारी कांबळे,सुनिल साळुंके,सतिश साळुंके,शामसुंदर साळुंके,संतोष वाघमारे,अजय ठालपवार,विठ्ठल वाघमारे,ज्ञानोबा वाघमारे,अशोक साळुंके,सौ.सुषमा प्रशांत साळुंके,शरद साळुंके,प्रणव साळुंके,सागर उमरानकर,विजय देशमुख,पंकज कुलकर्णी,राजकुमार सोनी,बाळकृृष्ण डांगे,अंकुश कवडे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *