• Wed. Apr 30th, 2025

महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

Byjantaadmin

Jan 24, 2023

महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

निलंगा(प्रतिनिधी):- महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे बी .फार्मसी प्रथम वर्ष बी फार्मसी द्वितीय वर्ष डायरेक्ट सेकंड इयर तसेच एम. फार्मसी प्रथम वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी आयोजित करण्यात आली होती .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी .फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एन पौळसर होते. व अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा चे प्राचार्य डॉ. एस. एस .पाटील सर होते यावेळी व्यासपीठावर प्रा .तगरखेडे मॅडम, प्रा हानपुडे सर ,प्रा गरड सर, प्रा .डॉ .तरंगे सर व प्रा डॉ उसनाळे सर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ पौळ सर यांनी विद्यार्थ्यांनी GPAT व नायपर या परीक्षेची तयारी कशी करावी व यामध्ये यश संपादन करण्यासाठी काय व कसे परिश्रम घेतले पाहिजेत याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. डॉ. एस. एस. पाटील सरांनी कॉलेजच्या वर्षभरातील विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच कॉलेजच्या मागील निकालाबद्दल सविस्तर अशी महिती दिली व भविष्य काळात विद्यार्थी साठी विविध उपक्रमांबदल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रवदन पांचाळ सरांनी केले तसेच अँटी रॅगिंग बद्दल डॉ .शेटकार सरांनी माहिती दिली, स्कॉलरशिप बद्दल डॉ. उसनाळे सरांनी माहिती दिली, विशाखा कमिटी बद्दल प्रा प्रीती माकने यांनी माहिती दिली तसेच लायब्ररी बद्दल श्री गार्डी सरांनी माहिती दिली यावेळी यावेळी प्रा रवी मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी शपथ देण्यात आली तसेच दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.
हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा कुंभार सर, प्रा शेख इर्शाद सर , प्रा परवेज सर, प्रा भालके मॅडम, प्रा सुजित पवार सर, प्रा .वाकोडे सर, प्रा .विनोद उसनाळे सर,प्रा हूनसनाळकर सर व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा सुनिल गरड सरांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *