औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूक,
शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम वसंतराव काळे
यांना विक्रमी मताधिक्यांने विजयी करावे
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : मंगळवार दि २४
शैक्षणिक क्षेत्र आणि शिक्षकांचे प्रश्नांची जाण असणारे औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांना
प्रथम पसंतीचे मत देऊन पून्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
येत्या ३० जानेवारीला होत असलेल्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे चौथ्यादा निवडणूक लढवीत आहेत. शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असलेले,
शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून ते सोडवून घेणारे आमदार विक्रम काळे यांना सर्व शिक्षक मतदार बंधूभगिनींनी प्रथम पसंतीचे मत दयावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून नवीपिढी घडविण्याचे काम सातत्यांने घडत असते त्यामूळे समाजाच्या, देशाच्या जडणघडणीत शिक्षण क्षेत्राचे महत्व अनन्य साधारण आहे. या क्षेत्राची जाण असलेले आमदार विक्रम काळे मागच्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडून सोडवून घेत आहेत. शिक्षकांचा आवाज बनून ते राज्यशासनाकडून या क्षेत्रातील समस्या सोडवून घेत आले आहेत. विनाअनुदानीत शाळा आणि शिक्षकांच्या समस्या, महिला शिक्षकांच्या रजेचा
प्रश्न त्यांनी अत्यंत पोटतिडकीने सरकारसमोर मांडले आहेत. शासनाला या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाग पाडले आहे. शिक्षण क्षेत्रातील केवळ समस्या न मांडता या क्षेत्रातील काळानुरूप कोणते बदल व्हायला हवेत, कोणत्या सुधारणा व्हायला हव्यात यासंदर्भातील सुचनाही आमदार काळे करत असतात. त्यामूळे राज्यातील शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल होऊन नवी पिढी सक्षम बनत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रसंगी आंदोलनाचीही भूमिका घेतली आहे.कायम विनाअनुदान धोरणातील कायम शब्द काढून टाकणे, कोरोना काळातील वेतन कपात न करणे, शाळांचे वेतन्यत्तर अनुदान सुरू करणे, कोरोनाचा समावेश वैद्यकीय बिलाच्या २८ आजाराच्या यादीत करून घेणे, संप काळातील पगार मंजूर करून घेणे यासाठी शिक्षक संघटनानी पुकारलेल्या अनेक आंदोलनात शिक्षकांच्या खांदयाला खांदा लावून ते सहभागी झाले आहेत. राज्यात जूनी
पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून ते आग्रही आहेत.
शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे त्यांच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी सदैव उपलब्ध असणारे अभ्यासू आमदार म्हणून आमदार विक्रम काळे यांची ओळख आहे. त्यांना महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
निवडणूकीत उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमदार काळे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी सक्रीय व्हावे असे आवाहन करून मतदार शिक्षक बंधूभगिनी यांनीही आमदार विक्रम काळे यांना
प्रथम पसंतीचे मत देऊन मताधिक्यानेने विजयी करावे, असे आवाहन या प्रसिध्दीपत्रकाद्वारे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.