छत्रपती शिवरायांचा इतिहास तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत – व्याख्याते निलेश चव्हाण
निलंगा:-तरुणांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे तरच सक्षम युवा पिढी निर्माण होईल असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे दुसरे पुष्प गुंफताना प्रसिद्ध व्याख्याते निलेश चव्हाण यांनी केले.
मराठा सेवा संघ आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव गायकवाड व प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे,बँक मॅनेजर सौरभ कुमार उपस्थित होते.
*पुढे बोलताना निलेश चव्हाण म्हणाले आजच्या तरुण पिढीने आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे मानसिक तणावातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल न उचलता शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहिजे त्यासाठी पालकांनी सुद्धा योग्य संस्कार मुलांना केले पाहिजेत, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले म्हणून स्वराज्य स्थापन झाले जिजाऊ माँसाहेब याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणापिठ, संस्कारपीठ, ज्ञानपीठ होत्या छत्रपतींच्या इतिहासाला दिशा देण्याचे काम जिजाऊंनी केले.स्वराज्यातील रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जगभर आहे त्यांचे विचार आत्मसात करून जीवन जगावे तरच समाजाची प्रगती होईल असे ते म्हणाले.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे प्रबोधन सुरू आहे यातून वेगळा विज्ञानवादी समाज नक्की घडेल असे मत त्यांनी व्यक्त केले व्याख्यानमालेची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे यांनी केले सूत्रसंचलन सतिष हानेगावे, उत्तम शेळके तर आभार एम एम जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक विनोद सोनवणे, इंजि. मोहन घोरपडे, अनिल जाधव, कुमोद लोभे,डी. बी. बरमदे, डी. एन. बरमदे,डॉ. नितीश लंबे,दत्तात्रय बाबळसुरे, ऍड. तिरुपती शिंदे, सुबोध गाडीवान, बंटी देशमुख, कुलदीप सूर्यवंशी,महेश जाधव,अंकुश धानुरे, माधव गाडीवान आदींनी परिश्रम घेतले.