बॉलीवूडसाठी सर्वात चांगली बातमी. शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी विक्रमी ~१४.६६ कोटींचे अॅडव्हान्स बुकिंग मिळवले. यापूर्वी हिंदीत प्रदर्शित झालेले १६ पैकी १५ चित्रपटच १५ कोटींहून अधिक अॅडव्हान्स बुकिंग मिळवू शकले. यात ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ वगळता सर्वच यशस्वी ठरले.
एवढेच नव्हे, १० चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. कोरोनानंतर केजीएफ-२ (~४३.५ कोटी) सोडला तर कोणत्याही हिंदी चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग ८.५ कोटींपेक्षा (रणवीर सिंगचा ८३) अधिक गेले नाही. ‘हॅप्पी न्यू इयर’नंतर या क्लबमध्ये पोहोचणारा शाहरुखचा पहिला चित्रपट आहे. सर्वाधिक अॅडव्हान्स बुुकिंगमध्ये सलमानचे ५ चित्रपट आहेत.
{सर्व भाषांमध्ये अॅडव्हान्स बुकिंगबाबत बाहुबली-२ सुमारे ८० कोटी रुपयांसह टॉपवर आहे. अॅव्हेंजर्स एंडगेम (६० कोटी) दुसऱ्या स्थानी आहे.