लातूर जिल्ह्यातील-लातुर शहर विधानसभा मतदारसंघातील मौजे कव्हा तालुका लातूर येथील असंख्य युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश
मौजे कव्हा तालुका लातूर येथील पिटले पांडुरंग संभाजी, सारगे रोहित राम,पिटले संदिपपान भागवत, कवरे अजय तुकाराम, कवरे ओम तुकाराम,पिटले बळीराम गहिनीनाथ, शेख रसूल मुक्तार, भालेराव अजय किशोर,गरगटे रितेश विक्रम.इ.या
तरुणाने विश्व हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान शिवाजी माने यांच्या हस्ते शिवबंधन बांधून व भगवा गमजा घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश स्वामी, उपजिल्हाप्रमुख-विष्णू साबदे, विधानसभा प्रमुख एस.आर चव्हाण, तालुका प्रमुख बाबुराव शेळके,शहर प्रमुख सुनील बसपुरे, विधानसभा संघटक माधव कलमुकले,शिवसेना महिला आघाडी माथाडी व जनरल कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रितीताई कोळी,तसेच सोशल मिडिया प्रमुख अजय घोणे व अनेक शिवसैनिक
हजर होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेना ही सर्वसामान्य लोकांची असून जात पात न मानता काम करणाऱ्याला संधी देते . तसेच सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा एकमेव नेता म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत कोण कितीही जरी काहीही बोलत फिरले तर भविष्यात शिवसेना हीच महाराष्ट्राला तारणारी व शेतकऱ्याला सर्वसामान्याला शेतमजुराला न्याय मिळवून देणारी संघटना असणाऱ्या यात कसलेही प्रकारची शंका नाही. शिवसैनिकांच्या ताकदीवर प्रामाणिक शिवसैनिकाच्या मेहनतीने निश्चितच या महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडके आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक शिवसैनिकच बसणार. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आपण सर्वजण एका निष्ठेने जोमाने कामाला लागूया यश हे आपलेच आहे.
लातूर जिल्ह्यातून औसा विधानसभा व निलंगा विधानसभा या दोन्ही मतदारसंघातील दोन आमदार शिवसेनेचे निवडून द्यायचे आहे. यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना योग्य ती संधी मिळणार असून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला शिवसैनिकाला निश्चित स्वरूपाने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे म्हणून आपण सर्वांनी शिवसेनेत जिल्हाप्रमुखापासून ते गटप्रमुखापर्यंतची बांधणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन शिवाजी माने यांनी केले आहे.