• Wed. Apr 30th, 2025

विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ला वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुट, पूणे यांच्या कडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पारितोषीक प्रदान

Byjantaadmin

Jan 22, 2023

विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ला

वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुट, पूणे यांच्या कडून

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पारितोषीक प्रदान

लातूर प्रतिनिधी :
विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट २ तोंडार, ता. उदगीर येथील कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून गळीत हंगाम २०२१-२२ साठी मिळालेले ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पारीतोषिक सहकार, साखर उदयोगातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक
प्रदान करण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे येथे ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसंगी शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी भव्य पारितोषीक सोहळा
संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी केद्रिंय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हषवर्धन पाटील, माजी मंत्री, व्ही.एस.आय.चे संचालक दिलीपराव देशमुख यांच्यासह सहकार, साखर उदयोगासह विविध क्षेत्रातील मान्यवर
कार्यक्रमास उपस्थित होते.

या प्रसंगी विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट २ ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून ऊत्कृष्ट तांत्री कार्यक्षमता प्रथम पारीतोषिक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परीवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख
यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक ए.आर.पवार, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रणजित पाटील, अमृत जाधव, सूर्यकांत सुडे, भारत आदमाने, रामदास
राऊत, गोविंद डूरे, संजय पाटील खंडापूरकर, सुभाष माने यांच्यासह अधिकारी यांनी स्विकारले.

आदरणीय विलासराव देशमुख  यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव
देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ला वसंदादा शुगर इन्स्टियुट कडून उत्तर पूर्व तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पारितोषीक मिळाले आहे. कारखान्याने गत गळीत हंगामात पूर्ण कार्यक्षमतेचा वापर केला, पाण्याची बचत केली, पाण्याचा पूर्नवापर केला, साखर उताऱ्यात ०.७७ टक्के वाढ केली,
गाळप क्षमतेचा वापर १०६. ३७ टक्के केला, ऊसतोडणी वाहतुक यंत्रणेचा कार्यक्षमतेने वापर केला, हंगामात कारखाना बंद राहणार नाही यांची काळजी घेतली, या सर्व कामाच कौतूक यावेळी सहकार आणी साखर उदयोगातील मान्यवरांनी
केले आहे.

ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता पारितोषिकाने विलास कारखाना युनीट २ ला गौरविण्यात आले, याबददल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व माजी मंत्री, संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई
देशमुख यांनी कार्यकारी संचालक ए.आर.पवार, सर्व संचालक, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचेअभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *