ग्रामरोजगार सेवकांचा कामावर बहिष्कार
निलंगा (प्रतिनिधी)केंद्र सरकारने 1.जानेवारी2023 पासून महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये नवीन नियमावली N.MM.S समाविष्ट केल्याने संबंध महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक यांना हजेरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे मुळात ग्रामरोजगार सेवक यांना अल्पप्रमाणात मानधन आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागवणे कठीण आहे.NMMS.द्वारे आँलाईन मोबाईल द्वारे मंजुराची हजेरी टाकण्यासाठी अनेक ग्रामरोजगार सेवक यांच्या कडे मोबाईल नाहीत.मोबाईल घेतले तर नेट बँलेस.कोण टाकणार नेट बँलेस टाकण्यासाठी कोणतीही तरतूद या नवीन जी.आर मध्ये केली नाही बँलेस टाकले तर NMMS. या नवीन सिस्टीम चे मार्गदर्शन नाही आँलाईन हजेरी कशा प्रकारे भरावे यांच्या कोणत्याही गाँईड.लाईन किंवा मार्गदर्शन तत्वे नाहीत या मुळे या नवीन प्रणाली मुळे मोठा पेच तयार झाला आहे मुळात ग्रामरोजगार सेवक हे अर्धवेळ कामगार आहेत आता NMMS.द्वारे आँलाईन मंजूर यांची संकाळ आणि दुपारी कामावर जाऊन हजेरी घेणे म्हणजे पुर्ण वेळ काम करणे आहे तरी शासनाने शासन सेवेत घ्यावे नियमाप्रमाणे पुर्ण वेळ ग्रामरोजगार यांना.कामाचा मोबदला देण्यात यावा. आशा प्रकारचे निवेदन संघटनेचे तालुका अध्यक्ष. वाघे कमलाकर. उपअध्यक्ष भोसले माधव .सचिव मोरे बालाजी .संघटक श्रीधर लोभे.माने सिध्दानाथ.काबळे आगंद शेख रशिद बिराजदार राम.निमोरे शंकर माने अरविंद माने संजीव भोसले.शेख जिलानी. राजेंद्र बिरादार जगदीश सुर्यवंशी.खंडु गायकवाड. विनायक माने.सुधाकर कसबे किसन लावदे यांच्या सह्याचे निवेदन निलंगा तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा.मा.मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर औसा आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदन दिले आहे जो मानधन वाढवणार नाहीत तोंडातपर्यंत रोजगार हमी योजना कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे