जागृति शुगर कारखान्याचे 3 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
कारखान्याने 10758600 युनिट वीज केली निर्यात
लातूर:-राज्यात खाजगी साखर कारखानदारीत उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर ने २०२२- २३ च्या चालु गाळप हंगामात 13 जानेवारी अखेर कारखान्याने 68दिवसात 3 लाख ०1250 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून 2.91,150 क्विंटल साखरेचे उत्पादन केले असुन को जनरेशनच्या माध्यमातुन 10758600 वीज युनिट निर्मिती केली असून महावितरण कंपनीकडे एक्सपोर्ट केले आहे मागच्या गाळप हंगामाचे सर्व रेकॉर्ड मोडून यावर्षी जागृती शुगर ने कमी दिवसांत जास्तीचे गाळप केले आहे
कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआर पी पेक्षा अधिक भाव दिला
जागृती शुगर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून जागृती शुगर कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याने मागच्या दहा वर्षात अधिक उसाचे गाळप करून भाव सुद्धा एफ आर पि पेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे व कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी दिली