• Wed. Apr 30th, 2025

डी . के. पाटील पब्लिक स्कुल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठया उत्साहात संपन्न

Byjantaadmin

Jan 13, 2023

डी . के. पाटील पब्लिक स्कुल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठया उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी

निलंगा:-विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी पन्नासावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती निलंगा शिक्षण विभागाच्या वतीने डी . के. पाटील पब्लिक स्कुल मध्ये संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सुरेश गायकवाड गट शिक्षण अधिकारी निलंगा यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष डी ,के पाटील पब्लिक स्कुलचे संस्थेचे दत्तात्रय पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश स्वामी विस्तार अधिकारी निलंगा ,पुरी मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुहासिनी पाटील मॅडम , अंकुशजी ढेरे, अरुण सोळुंके इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील एकूण 95 विज्ञान प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले होते.

पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या व विज्ञानाचा प्रसार व्हावा अशा विषयांवर आधारित प्रकल्पांचा देखावा या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेले पाहायला मिळाला . आधुनिकतेची कास धरत अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच जनसामान्यांना व्हावी यासाठी आकर्षक प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनातं विद्यार्थ्यांनी साकारली होती. त्यामुळे हा विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी या विज्ञान प्रदर्शनात हजेरी लावली होती. विज्ञान प्रकल्प उभारलेल्या स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थी अचूक अशी माहिती देत असल्याने त्यांच्याकडे पालक वर्गाकडून कुतूहलाने बघण्यात येत होते. जागतिक उष्मिकरण, पर्यावरण , पृथ्वीवर मानवाला जिवंत ठेवण्याचे प्रकल्प, पाण्याची बचत , विकसित शहरं , वृक्षारोपण , टाकाऊ पासून टिकाऊ, विजेची बचत, पाणी बचत, अशा अनेक विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनातून प्राथमिक व माध्यमिक विभागातून प्रत्येकी तीन प्रयोगाची निवड करण्यात आली. यावेळी निलंगा तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन देशमुख अतुल यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी मोहोळकर सर ,मडीवाल सर, पाटील सर , प्रीती मॅम , वलांडे मॅम, बरमदे मॅम , सुर्यवंशी सर, मुळे मॅम ,पाटील मॅम ,, संजीवनी मॅम ,शुभांगी पाटील ,विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक यांनी विशेष परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed