राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी यांचा भाजपात प्रवेश
माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थित
निलंगा:-माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी यांनी भारतीय जणता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला असून निलंगा राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
निलंगा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.या प्रवेशाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश सगर,धनराज सुर्यवंशी, ग्रा पं सदस्य दयानंद बामणे, ग्रा पं सदस्य पवन सुर्यवंशी, ग्रा पं सदस्य नवनाथ सुर्यवंशी, ग्रा पं सदस्य देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मगरध्वज सुर्यवंशी, राम सगर, किरण पाटील, पिंटू सुर्यवंशी, पापा उमाटवाडे, सुधाकर सुर्यवंशी, यादव सुर्यवंशी, वाघबंर मळेकरी, दत्ता येळीकर, बालाजी सूर्यवंशी, भिम सुर्यवंशी, पवन सुर्यवंशी, माधव सुर्यवंशी, विष्णूकांत सुर्यवंशी, विनोद माकणीकर, मेघराज सुर्यवंशी, उल्हास आकडे, आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
या निवडीचे चेअरमन दगडू सोळुंके,मधुकर माकणीकर, भाऊसाहेब आकडे, शाहूराज सुर्यवंशी, व्यंकट गायकवाड, शरद सुर्यवंशी, पिंटू येळीकर, महादेव सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.