इलेक्ट्रॉनिक चॕनलच्या जमाण्यात प्रेस मिडियाची विस्वार्था कायम-भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचे मत
निलंगा(प्रतिनिधी):-सध्याच्या इलेक्ट्रॉनिक चॕनेलच्या स्पर्धेच्या युगात आजही प्रिंट मिडडियाचे विस्वार्था कायम असून पञकारानी समाजउपयोगी लिखाणाच्या चळवळीतून आदर्श साष्ट्र् घडवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवहान भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यानी केले.
दर्पन दिनानिमित्त निलंगा मतदार संघातील सर्वच पञकारांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.व्यासपिठावर युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले,जिल्हा संघटन सरचिटनिस तानाजी बिरादार,निलंगा भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,मंगेश पाटील,संजय दोरवे,रामभाऊ काळगे,नरेश बिराजदार,शकील देशमुख अदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले कोणत्याही राजकीय पक्षाची विचारधारा न मांडता सत्य व मार्गदर्शनात्मक लिखान करावे जेणेकरून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळेल.पञकार आणि लोकप्रतिनिधी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.पञकारांनी बाळशास्ञी जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पञकारीता करावी.तसेच पञकार हा समाजाचा आरसा आहे,तो आरशासारखेच कार्य करावे.सध्या प्रिंट मिडियासमोर इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडियाचे मोठे आव्हान आहे.परंतु यावर मात करण्याची ताकद फक्त प्रिंट मिडियामध्येच आहे.असे त्यांनी सांगितले. शिवाय पत्रकारांनी विकासात्मक बातम्या बरोबर समाजातील सकारात्मक घटनाही मांडण्याची गरज आहे. निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ येथे स्वतंत्र पत्रकार भवन व्हावे यासाठी प्रयत्न करू असे सांगून सध्याच्या शासनाकडून शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूरी मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार राम काळगे, शकील देशमुख, नरेश बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.