क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडी तर्फे विनम्र अभिवादन
निलंगा:- भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसुधारक,कवयित्री,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली आहे. शिवसेना महिला आघाडी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्तिथ सर्व मान्यवरांनी देखील यावेळी विनम्र अभिवादन केले. उप जिल्हाप्रमुख विनोद आर्य, तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, उपजिल्हाप्रमुख युवा सेना अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख युवासेना प्रशांत वांजरवाडे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, उपशहर प्रमुख मुस्ताफा शेख, जगदीश लोभे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख लाईक शेख,. , महिला आघाडी तालुका संघटिका रेखा ताई पुजारी , शहर संघटिका दैवता ताई सगर, संगीता कदम राष्ट्रवादी उपाध्यक्ष, उप तालुका प्रमुख सविता पांढरे, उपशहर प्रमुख अरुणा माने, रंगुबाई आंबादास सगर, मंठाळी सुनीता सर्कल प्रमुख मंगल कांबळे आधी या कार्यक्रमात उपस्थित होते.