निलंगा:-हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह उर्फ दादापीर दर्गा 411 वा उर्स निलंगा येथे संपन्न होणार आहे हिंदू मुस्लिम एक्येचे प्रतीक असलेले निलंगा येथील हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह नबीरा काद्री उर्फ दादापीर शरीफ यांच्या 411 वा उर्स निमित्त विविध धार्मिक, व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि 03/01/2023 रोजी निलंगा येथील काझी यांच्या घरापासून संदल निघेल तर दि. 04 व 05 रोजी चिरागा या दिवशी कुराण पठण व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 06 रोजी करीबसवेश्वर मठ संस्थान चे धर्मगुरू श्री गुरू मुरुगेंद्र महास्वामी यांचा उर्स कमिटीच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात येणार आहे तर उत्तर प्रदेश चे माजी राज्यसभा चे सदस्य हजरत मौलाना उबेदुल्लाह खान आजमी यांचे प्रवचन देशाच्या एकतेवर होणार आहे.
तसेच दि 06 रोजी रात्री हैद्राबाद येथील सुप्रसिद्ध कव्वाल परवेज हुसेन हैदराबादी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम होणार असून सदरील दादापीर दर्गा हे निलंगा शहरांतील सर्वधर्मसमभाव चे असून या यात्रे निमित्त महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगणा, विविध राज्यातून हजारो भाविक येऊन दर्शन घेत असतात हा दर्गा जागृत असून इथे कोणताताही भेदभाव नसतो.
या दर्ग्याच्या माध्यमातून सामाजिक समतोल राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव ची वागणूक मिळत असते.अशी माहिती हजरत दादापीर दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद शहा हैदरवली नबीरा काद्री यांनी दिली.
411 वा उर्स यशस्वी होण्यासाठी सर्व पक्षीय, सामाजिक,धार्मिक, पदाधिकारी व कार्यकर्ते भक्त गण परिश्रम घेत आहे. असल्याची माहिती सज्जादा साहेबांनी दिली.