लातूर शहराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी आशियाई विकास बँक
निधीतून 960 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा
जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन व मुख्य प्रशासकीय इमारत बांधकामांसाठी 371.50 लक्ष रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर करावा,
शहरातील जुने गोडाऊन स्थलांतरित करून
सदरील जागा महापालिकेस उपलब्ध करून द्यावी
लातूर जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामाला
दिलेली स्थगिती त्वरित उठवावी
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे
माजी मंत्री आमदार विलासराव देशमुख यांची मागणी
नागपूर (प्रतिनिधी) २९ डीसेंबर २०२२ :
लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय मारत, नियोजन भवन उभारणीसाठी तांत्रीक सहमती प्राप्त झाली आहे त्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाकडून सादर केलेल्या ३७१.५० लक्ष रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून दयावा, लातूर शहरातील जूनी शासकीय गोदामे नवीन जागेत स्थलातरीत करून जूनी जागा मनपास हस्तांतरीत करावी, लातूर शहराच्या नियोजित बाहयवळण रस्तासाठी ९६० कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दयावा त्याच बरोबर लातूर जिल्हयातील रस्ते व पूलाच्या कामा लादिलेली स्थगीती त्वरीत उठवावी आदी मागण्या राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान आज नागपूर येथे राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली लातूर शहर व जिल्हयातील विविध विकासकामांच्या संदर्भांने त्यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्धतेची मागणी केली.
लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिेाणी जून्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत व नियोजन भवन उभारण्याची योजना तयार आहे, त्यासाठीच्या अंदाजपत्रकास तांत्रीक सहमती प्राप्त झाली आहे. या कामासाठी ३७१.५० लक्ष रूपये खर्च अपेक्षित असून शासनाकडे प्रस्ताव दाखल आहे त्यास मंजूरी देण्यात यावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
शहरातील जुने गोडाऊन स्थलांतरित करून
सदरील जागा महापालिकेस उपलब्ध करून द्यावी
लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी पुरवठा विभागाची जूनी मोडकळीस आलेली गोदामे आहेत त्यांची पूर्नबांधणी करणे आवश्यक आहे. सदरील पुर्नबांधणी करणे ऐवजी ती गोदामे महापलीकेच्या शेराबाहेरील जागेत स्थलांतरीत करण्यात यावीत,रिकामी झालेली जाग महापालीकेस देण्यात यावी, त्या ठिकाणी मनपा सार्वजनीक प्रयोजनाचे उपक्रम राबवू शकेल, शिवाय शहरातील वाहतूकीची अडचण दूर होणार आहे, या अनुषंगाने दाखल असलेल्या प्रसतावास मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
लातूर शहराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी आशियाई विकास बँक निधीतून 960 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा
लातूर शहराचा विस्तार लक्षात घेता शहराच्या बाहेरून जवळपास 62 कीमीवळणरस्ता प्रस्तावीत केला असून त्यासाठीचे बहूतांश जमीन अधिगृहनही झाले आहे, या रस्ते बांधणीसाठी अशीयाई विकास बॅक निधीतून ९६० कोटी रूपये,उर्वरीत जमीन अधिगृहनसाठी ६० कोटी आणि लातूर – अंबाजोगाई (एकमत चौक) ते नांदेड वळणरस्ता (साई चौक) ते रेल्वेस्टेशन रस्ता रूंदीकरणासाठी ८० कोटी रूपये मंजूर करावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली आहे.
जिल्ह्यातील रस्ते व पुलाच्या बांधकामावर असलेली स्थगिती त्वरित उठवावी
लातूर जिल्हयातील लातूर शहराचा विस्तार लक्षात घेता शहराच्या बाहेरून जवळपास 62 कीमी वळणरस्ता प्रस्तावीत केला असून त्यासाठीचे बहूतांश जमीन अधिगृहनही झाले आहे, या रस्ते बांधणीसाठी अशीयाई विकास बॅक निधीतून ९६०कोटी रूपये, उर्वरीत जमीन अधिगृहनसाठी ६० कोटी आणि लातूर – अंबाजोगाई (एकमत चौक) ते नांदेड वळणरस्ता (साई चौक) ते रेल्वेस्टेशन रस्तारूंदीकरणासाठी ८० कोटी रूपये मंजूर करावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर-हरंगुळ चिंचोलीराव आलमला मध्य रस्त्याची पुनर्बांधणी करणे, (विस्तारीत लातूर शहर ते नवी एमआयडीसी) राज्य मार्ग -242 निधी लक्ष ३५०.००, लातूर-हरंगुळ चिंचोलीराव आलमला रस्त्यावर सी.सी.नाली बांधकाम करणे निधी लक्ष ४५०.००, मुरुड वळणरस्त्याची सुधारणा करणे निधी लक्ष ५००.००, प्रजिमा-9-माटेफळ-खंडाळा-गोंदेगां