राजमाने कुटुंबियांना डॉ.अरविंद भातांब्रे यांच्याकडून 21,000/ आर्थिक मदत
निलंगा:- मागील झालेल्या अतिवृष्टी काळात काटेजवळगा ता. निलंगा येथील स्व. वैजीनाथजी श्रीपती राजमाने (वय 45) हॆ पाणी प्रवाहात वाहून दुःखद निधन झाले. या कठीण प्रसंगी त्यांच्या काटेजवळगा येथील निवासस्थानी जाऊन निलंगा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी 21,000/-आर्थिक मदत केली. राजमाने कुटुंबियांना धीर दिला पुढील काळात कोणतीही अडचण असेल किंवा दवाखाना असेल आम्ही आपल्या सोबत आहोत असा शब्द राजमाने कुटुंबियांना दिला. या वेळी औराद महसूल मंडळ निरीक्षक ॲड.संदीप मोरे पाटील,अंबुलगा महसूल मंडल निरीक्षक पंकजजी शेळके,आंबेगावचे चेअरमन प्रमोदजी मरुरे, ॲड. अपरजीतजी मरगने, धनाजी चांदुरे, गावातील गौतम कांबळे, इस्माईल सोनवणे, आनंदा रक्टे, संग्राम बिरादार, प्रकाश भोसले, श्रीनाथ माळी, ज्योतीराम सूर्यवंशी, कुमार पारेकर, बालाजी माळी, धिरज सोमवंशी, उद्धव पाटील, राम बडगे, दगडू सोमवंशी, अमर राजमाने व गावातील नागरिक उपस्थित होते.
