• Thu. Feb 5th, 2026

महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल: विलासराव देशमुख फाउंडेशनच्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणकेंद्राचा यशस्वी समारोप

Byjantaadmin

Oct 5, 2025

महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल: विलासराव देशमुख फाउंडेशनच्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण
केंद्राचा यशस्वी समारोप

लातूर प्रतिनिधी,
विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूरच्या वतीने लातूर शहरातील औसा रोड येथे सुरू करण्यात
आलेल्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच पार पडला. या
कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ४८ महिलांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरवण्यात आले.
महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणातून

महीलांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश

ट्वेंटीवन ॲग्री लि. च्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा
उपक्रम राबविण्यात आला होता. लातूर शहरातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यावसायिक
प्रशिक्षण देणे, हा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश आहे. या प्रशिक्षण केंद्रात महिलांना २ महिन्यांचे ब्युटी
पार्लरचे व्यावसायिक प्रशिक्षण मोफत देण्यात आले.
या प्रशिक्षणादरम्यान महिलांना ब्युटी पार्लरच्या विविध पद्धती, जसे की वॅक्सिंग, मॅनिक्युअर,
पेडिक्युअर, थ्रेडिंग, हेअरकटिंग यांसारख्या सौंदर्यविषयक सेवांचे सखोल ज्ञान देण्यात आले. प्रशिक्षण
पूर्ण केल्यामुळे या महिलांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

समारोप कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

पशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला लातूर शहर काँग्रेसचे सचीव तथा विलास को-ऑप
बँकेचे संचालक गणेश एस.आर. देशमुख, विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या समन्वयक संगीता
मोळवणे, रेणुका शिंदे, गजानन बोयणे यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *