पूरग्रस्तांसाठी शिवाई प्रतिष्ठानची बांधिलकी किराणा किटसह ब्लँकेटसचे वाटप
लातूर, प्रतिनिधी
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने मोठे नुकसान झाले असून अनेक
नागरीकांच्या घरां- संसारास त्याचा मोठा फटका बसला आहे. आपत्तीने
भरडलेल्या अशा परिवारांसाठी लातूर येथील शिवाई प्रतिष्ठान सरसावले असून
प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना देण्यासाठी शंभर किराणा किट व शंभर
ब्लँकेटस बुधवारी (दि.१) सुपूर्द करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा भोसले होत्या.
डॉ. जयश्री धुमाळ, संगिता देशमुख, सई गोरे, डॉ. माधुरी कदम, डॉ.
हर्षवर्धन राऊत, डॉ. अभय कदम, हंसराज जाधव, विशाल जाधव, डी.एस. पाटील,
धनंजय शेळके आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उषा भोसले यांनी शिवाई
प्रतिष्ठान सदैवच सेवाकार्यात पुढे असते शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण
आदीत कार्य सुरू असल्याचे सांगितले. डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी आपत्तीने
बाधीत झालेल्या कुटूंबाना आधार देणे ही आजच्या क्षणाची गरज असून याच
जानीवेतून शिवाईने केलेली ही मदत गरजुंच्या दारापर्यंत जाऊन दिली जाईल
असा विश्वास दिला. डॉ. अभय कदम यांनी शिवाईचे हे सेवाकार्य इतरांना
प्रेरणा देईल असे सांगितले. डी.एस. पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल विस्ताराने माहिती दिली. प्रास्ताविक डॉ.
माधुरी कदम यांनी केले. सुत्रसंचालन सुरेखा गरड यांनी केले. आभार
प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. जयश्री धुमाळ यांनी मानले. या कार्यक्रमास
मोठ्या संख्येत शिवाईंची उपस्थिती होती.
