• Tue. Apr 29th, 2025

महापुरूषांच्या अपमानावरून वातावरण तापलं; सत्ताधारी-विरोधकांचा गोंधळ, विधान परिषदेचं कामकाज तहकूब

Byjantaadmin

Dec 27, 2022

महापुरूषांच्या अपमानावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधककांनी जोरदार गोंधळ घातला. दोन्हीकडील गोंधळानंतर आजच्या दिवसाचं विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केल्यानंतर त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा पाडाच वाचून दाखवला. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजा आणि इतर युग पुरूषांपेक्षा कोणीही मोठा नाही. उत्तर प्रदेशमध्ये युगपुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदा आणला. आपणही असा कायदा आणाला पाहजे. हा कायदा आपल्याकडे आणला तर महापुरूषांबाबत बोलतना प्रत्येकजण विचार करतील. मंत्री मंडळात नंबर लावण्यासाठी काही जण अशी वक्तव्य करत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मान कापली तरी चालेल पण महारांचा अवमान सहन करणार नाही असे म्हणतात. मात्र राज्यात  अवमानाची मलिकाच सुरू आहे, त्यामुळे याबाबत कायदा आणावा अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर अनेक आरोप केले.

राज्यात कोणत्याच महापुरुषांचा अपमान होणे योग्य नाही. महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी एक विधेयक आणण्याची मागणी काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसं पत्र देखील दिलं आहे. परंतु, विरोधकांकडून काही जणांनी मागणी केली की उदयनराजे खरचं शिवजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे द्या. असेच एक महिला नेत्या म्हणाल्या की संजय राऊत यांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत असे म्हटले आहे. राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात. संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात, त्यावेळी कोणी काहीच बोलत नाहीत,” असा आरोप उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी यावेळी केलाय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावं हे योग्य नाही. सभागृहात वस्तूस्थिती मांडताना दोन्ही बाजूने मांडावी. ज्या वारकरी संप्रदायाने जातविरहीत समाज घडवला. त्यांना कधीही जात विचारली नाही. राहुल कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोच्या जागी आदीत्य ठाकरे यांचा फोटो लावला होता. लालू प्रसाद यादव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलले होते? राहुल गांधी सावरकरांचा सतत अपमान करतात. सावरकरांना भारतरत्न नाही मिळाला तरी चालेल, पण त्यांचा अवमान चालणार नाही.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवतांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा पाडाचं वाचला. यावेळी दोन्ही बाजुंनी जोरदार गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर विधान परिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed