मांजरा साखर 3150 रुपये पेक्षा अधीक उसाला उच्चांकी भाव देणार ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप उद्दिष्ठ*
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती मांजरा साखर कारखान्याची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
लातूर -लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांची दूरदृष्टी किती मोठी होती याचा अंदाज लोकांची झालेली प्रगती प्रत्यक्षात डोळ्यासमोर दिसत असलेला विकास हे आज आपल्या जिल्ह्यात मांजरा परिवाराच्या माध्यमातून दिसून येत असून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मांजरा साखर परिवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून आगामी गाळप हंगामात मांजरा साखर कारखाना ३१५० रुपयापेक्षा अधिक उच्चांकी भाव देणार असल्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी जाहीर केले ते गुरूवारी आयोजीत करण्यात आलेल्या विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख माजी आमदार वैजनाथजी शिंदे , राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेनाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे मांजराचे माजी चेअरमन धनंजय देशमुख रेनाचे चेअरमन अनंतराव देशमुख मारुती महाराज चे चेअरमन श्याम भोसले मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेनाचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, मारुती महाराजचे उपाध्यक्ष सचिन पाटील ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख , मारुती महाराज चे माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे मांजरा साखर चे कार्यकारी संचालक पंडित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते
९ लाख मेट्रिक टन उसाचे उद्दिष्ट
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात नावलौकिक असलेल्या मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने दिमाखाने उभे आहेत परिवारातील कुठलेही साखर कारखाण्याकडे बँकेचा हप्ता थकलेला नाही इतकचं नव्हे तर आपल्या परिवाराने सर्वाधिक उसाला भाव देवुन एफआरपी पेक्षा अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न केला आहे हे करीत असताना यात आम्ही कुठलेही राजकारण करत नाही आम्ही समाजकारण करतो लोकांच्या कल्याणासाठी यापुढेही आम्ही कायम करत राहणार असून आगामी काळात होणाऱ्या गळीत हंगामासाठी ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली
केवळ वार्षिक सभा नसून हा उत्सव-माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना आमदार अमित विलासरावजी देशमुख यांनी मांजरा साखर कारखाना गेली ४० वर्षापासून अविरत शेतकरी सभासदांची सेवा करत असून मांजराचे नाते हे शेतकऱ्यांच्या चुलीशी राहिलेले आहे यातूनच एक आपल विश्वासाचं नातं तयार झालेले आहे असे सांगून आजची सर्वसाधारण सभा नव्हे तर एक आनंदाचा उत्सव आहे असे सांगून ही वाटचाल यापुढेही आपल्या भक्कम पाठिंब्यावर अविरत पने पुढे चालू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
उसाची क्रांती घडली बँकेचे -चेअरमन धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
आपल्या भागात कधी काळी दुसऱ्या भागातून गाळप करण्यासाठी आणायचो आता मात्र जिल्ह्यात जिकडे तिकडे उसाचे पीक दिसत आहे यासाठी आपल्या परिवाराने प्रचंड मेहनत व लोकांचा विश्र्वास संपादन केला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही असे सांगून उस तोडणीसाठी जिल्हा बँकेने मोठया प्रमाणात १०४ कोटी रुपये कर्ज दिले आज जिल्हाभरात पाच हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याचे कार्य जिल्हा बँकेकडून झालेले हे आज परिवर्तन दिसत आहे यापुढेही मांजरा परिवार लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे ग्वाही जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांनी दिली
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, माजी उपाध्यक्ष तथा संचालक श्रीशैल्य उटगे यांनी मनोगत व्यक्त केले या सर्वसाधारण सभेचे वाचन कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी केले त्यास संचालक मंडळाने सूचक व अनुमोदन दिले सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मान्यता दिली यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी मांजरा साखर परिवारातील संस्थांचे चेअरमन कार्यकारी संचालक,संचालक मंडळ उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
