शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे कमी पडत असतील तर हे घ्या म्हणून सरपंचाने पैशाचे बंडल तहसीलदार यांच्यावर भिरकावले
निलंगा, : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे अपुरे पडत असतील तर हे घ्या आम्ही देतो म्हणून माकणी ता. निलंगा येथील सरपंचाने तहसीलदाराकडे पैशाचे बंडल भिरकावले याबाबत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून संबंधित सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबतची माहिती अशी की सध्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीमुळे व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे परंतु शासनाकडून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टर पर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत तुटूपूंजी असल्यामुळे शासनाकडे जर पैसे नसतील तर मी देतो म्हणून मागणीचे सरपंच राहुल मागणीकर यांनी थेट पैशाचे बंडल तहसीलदारावर भिरकावले याबाबत संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंचावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिवृष्टीच्या मदतीबाबत सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निर्माण होत असून जाहीर होणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी अतिशय अत्यल्प आहे त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.
