• Thu. Oct 16th, 2025

शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मोठी मदत आणि कर्जमाफी करा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Byjantaadmin

Sep 25, 2025

शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मोठी मदत आणि कर्जमाफी करा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे : लातूरमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तांना दिला दिलासा

लातूर : शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. शेत जमीनच वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. अशा प्रसंगात सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस मदत करावी, अशी मागणी करतानाच शिवसेना पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारपासून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लातूर तालुक्यातील तांदुळवाडी आणि तांदुळजा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, मिलींद नार्वेकर, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण, माजी आमदार धीरज देशमुख, दिनकर माने, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, नामदेव चाळक, सौ. जयश्रीताई उटगे, सौ. सुनीताताई चाळक, तालुकाप्रमुख कैलास पाटील, विशाल शिंदे, मल्हारी तनपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांनी ही सर्व परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरणार असल्याचेही सांगितले.शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का ? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की, सर्व जमीनच वाहून गेली आहे.  आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे आहेत. त्यामुळे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, तसेच कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  

——–

सरकारची मदत तुटपुंजी…

मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे, येथे अवर्षण हे नेहमीचे आहे. मात्र, पहिल्यांदाच येथे अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे येथील नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर येते की नाही, याकडेही लक्ष ठेवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *