• Fri. Oct 17th, 2025

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या शुभहस्ते छबिना मिरवणुकीची सुरुवात

Byjantaadmin

Sep 25, 2025

नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात घटस्थापना
——————————————
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या शुभहस्ते छबिना मिरवणुकीची सुरुवात
————————————————

लातूर :  खुर्दळी (ता.चाकूर) येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम प्रथा, परंपरा, रितीरिवाजानुसार रविवारी (दि.२१) रोजी कलश यात्रा, छबिना मिरवणूक, आराधी, वाजंत्री यांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालखीतून देवीची गावामध्ये छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपाच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
         पालखी मिरवणुकीचे स्वागत व पूजन गावात अनेक ठिकाणी करण्यात आले. समारोप माजी आमदार  बब्रुवान खंदाडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, चाकूरचे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, शिवलिंग स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. चंद्रकांत साळुंके या दांपत्याच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी घटस्थापना करून देवीची आरती करण्यात आली.         
        या नेत्रदीपक सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, अनिल वाडकर, पोलीस निरीक्षक बालाजीराव भंडे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अरविंद बिराजदार, वकील संघाचे अध्यक्ष संतोष गंभीरे पाटील, भानदासराव पोटे, यशवंतराव जाधव, दयानंद सुरवसे, संदीप शेटे, विवेकानंद शिंदे, सिद्धलिंग महाराज मठ लखनगाव चे मठाधिपती आबा महाराज गिरी, प्रचिता संजयकुमार भोसले, मोहन महाराज साळुंके, चेअरमन जलील पटेल, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बालाजी भोसले, पोलीस पाटील साहेबराव पाटील, माजी सरपंच अशोकराव कर्डिले, माजी उपसरपंच बब्रुवान भोसले, ग्रामपंचायत सदस्य बाबुभाई दिवाणजी, काशीम पटेल, ओमप्रकाश रेड्डी, यशवंत कर्डिले, ज्येष्ठ पत्रकार विकास गाढवे, व्हॉइस ऑफ मीडिया चे अध्यक्ष विनोद निला, प्रशांत शेटे, सुधाकर हेमनर, संजय पाटील, मधुकर कांबळे, गणेश स्वामी, श्री जनमाता आई देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद जाधव, सचिव ज्ञानोबा जाधव, कोषाध्यक्ष संगमेश्वर जनगावे, विश्वस्त शुक्राचार्य नरहरे, मधुकर  नरहरे, विजयकुमार भोसले, पांडुरंग शिंदे, जगदीश भोसले, अनिल रेड्डी, अविनाश शिंदे, शशिकांत शिंदे, अमर पाटील, हावगीराज जनगावे, सिद्धेश्वर चामले, भागवत चामले, संकेत भोसले यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भाविक भक्त, मानकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

————
श्री.जनमाता आई देवस्थानसाठी लागेल तेवढा निधी देऊन मंदिराचा विकास घडवून आणणार आहे. या मंदिराचे महत्व अनादी कालापासून आहे. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. महाराष्ट्र राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम पाहत असलो तरी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे, मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी व आर्थिक उन्नतीसाठी मी देवीकडे प्रार्थना करत आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले

————
आपल्या भागात अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती करत महाराष्ट्राचा बळीराजा सुखी होऊ दे, भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत, मातृशक्तीला सुरक्षितता, समृद्धी मिळू देत, महिलांचे प्रश्न प्रखरतेने सोडवले जावेत हि जनमाता देवी चरणी प्रार्थना भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केली.
————

————
खुर्दळी परिसरातील शेतकरी समृद्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य व आमदार असताना अनेक प्रयत्न केले. या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये अनेक पाझर व साठवण तलाव करून येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मी प्रयत्न केले आहेत असे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी सांगितले.
————

————
मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी व तीर्थक्षेत्र विकासासाठी यापुढे लागणाऱ्या विकास कामाचा आराखडा तयार करून पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिले.
————

आयुष्यामध्ये चांगली संगत, चांगले आचार विचार खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे भाविक भक्तांनी सत्संगाची कास धरावी असे आवाहन शिवलिंग स्वामी महाराज  यांनी केले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *