स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत “महाराष्ट्र” चे विद्यार्थी अव्वल
निलंगा: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी- २०२५ मध्ये घेतलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केली यात निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे १४ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेले आहेत.
महाविद्यालयातील बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु.लंगुटे सरस्वती राजू हिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कार्यक्षेत्रातून राज्यशास्त्र व इतिहास या दोन विषयात सुवर्णपदक प्राप्त करून दुहेरी यश मिळवलेले आहे तर कु.पाटील सिंधुताई जयप्रकाश हिने लोकप्रशासन या विषयात सुवर्णपदक मिळवलेले आहे.
संगणकशास्त्र या शाखेतील विद्यार्थ्यांनी या वर्षीही यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. बी.सी.ए. शाखेतून कु.चव्हाण गायत्री कालिदास हिने विद्यापीठ कार्यक्षेत्रातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली आहे तर कु.सावंत पार्वती विठ्ठल बी.सी.ए. शाखेतून विद्यापीठातून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. तसेच एम.एस्सी.(संगणकशास्त्र) मधून विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान हा कु. पवार अवंतिका दत्तात्रेय हिने पटकावलेला आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थीही गुणवत्ता यादीत मागे नाहीत. महाविद्यालयातील सोनकांबळे रत्नशिल तुकाराम हा विद्यार्थी रसायनशास्त्र विषयात सर्वाधिक घेऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला आहे. बी.एससी शाखेतून विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान कु.पांचाळ स्नेहा संजीव,बी. कॉम शाखेतून विद्यापीठातून सर्व द्वितीय कु.शेख अंजुम सिकंदर, पदवी द्वितीय वर्ष इंग्रजी अनिवार्य या विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान कु.मासूलदार सानिया सिराज हिने तर अर्थशास्त्र विषयातून विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान कु.गिरी काशीबाई सुंदर हीने मिळवलेला आहे.
बी.व्होक शाखेतील वेब प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील पहिले तीनही विद्यार्थी हे महाराष्ट्र महाविद्यालयातील आहेत. यात अनुक्रमे प्रथम सूर्यवंशी कृष्णा जीवन, द्वितीय कु.शेख सानिया मुबारक व तृतीय कु.पाटील संध्या संजय यांनी यश संपादन केलेले आहे. तसेच फूड प्रोसेसिंग अँन्ड प्रीजर्वेशन स्टोरेज या विभागातील प्रथम कु.कांबळे आकांक्षा विश्वनाथ, द्वितीय कु.भालके सुप्रिया गणेश, तृतीय कु.मंठाळे अंकिता विलास या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. महाविद्यालयातील कु.गीता वाडकर व कु.कौशल्या बेलकुंदे या विद्यार्थ्यांनीनी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत मिळवलेल्या यश मिळवले.
विद्यार्थ्यांच्या या सुवर्ण यशाबद्दल महाविद्यालय परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. या गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.विजय पाटील निलंगेकर, सचिव श्री. बब्रुवानजी सरतापे, प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपप्राचार्य डॉ. भास्कर गायकवाड, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.बालाजी गायकवाड,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुभाष बेंजलवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शिवरुद्र बदनाळे, वाणिज्य विभागाचे डॉ. सूर्यकांत वाकळे, डॉ. नरेश पिनमकर, इंग्रजी विभागाचे डॉ.अजित मुळजकर, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल सांडूर, संगणक शास्त्र विभागाचे प्रा. रवींद्र मदरसे, प्रा. गिरीश पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. हंसराज भोसले,रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रामेश हीरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.
