शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ, संभाजी ब्रिगेड मैदानात…. हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी संभाजी ब्रिगेडची मागणी
निलंगा :- संपूर्ण राज्यांमधे मागील काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. सर्व नद्यांना महापूर आला आहे.सगळीकडे हाहाकार झाला आहे. शेतीचे पीक शेतीचे बांध शेतकऱ्याचे जनावरे शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेले यामध्ये एक अनेकांचे संसार मोडले. अनेकांची पशुधन वाहून केली शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकार मायबाप तात्काळ शेतकऱ्याच्या सन्मानार्थ दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी एक लाख रुपयाची आर्थिक मदत करून याचा संसार उभा करण्यासाठी हातभार लावावा यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे निलंगा उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देऊन मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षाचा रेकॉर्ड या पावसाने मोडला असून खरिपाचे पीक हे नासाडी झाली आहे. ऊस आडवे फडून गेले तर तुर पिवळी पडली आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या पदरात फक्त निराशाच आहे. तसेच आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीची आश्वासन जनतेला दिले होते.मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर आपणास पडला आहे. शेतकरी पूर परिस्थितीतून जात आहे सध्या शेतकऱ्याचा कणा मोडला आहे आणि या मोडलेला कण्याला आधार देण्याचे काम सरकारने करावे. कारण महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत.है वास्तव आहे.
त्यामुळे तात्काळ बळीराजाला आर्थिक मदत करून हातभार लावावे.
महाराष्ट्रात मराठा धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाज बांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावनाही अत्यंत तीव्र आहेत सरकारमधील काही आपले प्रतिनिधी व जबाबदार मंत्री या संवेदनशील विषयावर विक्षिप्त विधाने करून वातावरण बिघडवत आहेत जातीतील निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत राज्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारी हा विषय निकाली काढून असे बेजवाबदार बेताल वक्तव्य करणाऱ्यांना तंबी द्यावी. व मराठा ओबीसी व इतर जातीय संघर्ष तीळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ऊसाला सहकारी अथवा खाजगी कारखानदार एफआरपीप्रमाणे सात दिवसात उसाची रक्कम देण्यासाठी पारदर्शक कायदा करावा दुधाला 70 रुपये प्रति लिटर भाव द्यावा व होणारी भेसळ थांबवावी अशा आशियाचे निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, सिद्धेश्वर तेलंगे,शहराध्यक्ष परमेश्वर बोधले, तालुकाउपाध्यक्ष सगरे गोविंद,तालुका संघटक परमेश्वर जाधव,पत्रकार जावेद मुजावर,गणपतराव वरवटे,शिवदास मोरे,अभिमन्यू जाधव,आकाश राठोड,सुनील राठोड,अनिल राठोड, वसंत राठोड अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

