• Thu. Feb 5th, 2026

खाजगी अभियांत्यामार्फत देणार बांधकाम परवाना

Byjantaadmin

Sep 23, 2025

खाजगी अभियांत्यामार्फत देणार बांधकाम परवाना

लातूर /प्रतिनिधी :लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये खाजगी अभियंत्यामार्फत भूखंडावर बांधकाम परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे.मंगळवारी (दि. २३) मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, सहाय्यक संचालक नगर रचना अनिकेत महाजन,क्रेडाइचे अध्यक्ष उदय पाटील यांच्यासह मनपा येथे नोंद्णीकृत असणाऱ्या अभियंत्यांची उपस्थिती होती.

  लो रिस्क अंतर्गत अर्जदारांना G+2 बांधकाम परवाना खाजगी अभियंत्यामार्फत देता येईल. १५० स्क्वेअर मीटरच्या मर्यादेत हा परवाना असेल. मंजूर एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० अंतर्गत ही परवानगी असणार आहे. अनधिकृत कामे टाळण्यासाठी तसेच या संदर्भात भविष्यात तक्रार आली किंवा अनधिकृत बांधकाम केले तर संबंधित खाजगी अभियंता व अर्जदाराचे व्यावसायिक परवाने रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची तरतूदही यात आहे.

    या बैठकीत गुंठेवारी संदर्भातही चर्चा झाली. गुंठेवारी नियमित सुरू करण्यात यावी असा प्रस्ताव खाजगी अभियंत्यामार्फत देण्यात आला.गुंठेवारी नियमितीकरण अंतर्गत भूखंड व बांधकाम हे नियमित करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.त्या अनुषंगाने भूखंड व बांधकाम २०२० च्या अगोदर झालेले असणे आवश्यक आहे. अधिक बांधकाम असणाऱ्या प्रस्तावामध्ये गुंठेवारी अधिनियम २००१ च्या अनुषंगाने शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *