• Thu. Feb 5th, 2026

माजी मंत्री, आ.अमित देशमुख यांच्याकडून निवासस्थानी नागरिकांच्या समस्यांचे निवारण

Byjantaadmin

Sep 21, 2025

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या समस्यांचे निवारण


राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांची भेट घेतली. लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटना, तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार देशमुख यांनी नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या समजून घेतल्या. त्यांच्या निवेदने आणि निमंत्रणांचा स्वीकार करून त्यांनी संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना दिल्या. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, माजी व्हाइस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक कैलास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, पप्पू देशमुख, व्यंकटेश पुरी, अब्दुल्ला निचलकर, विकास कांबळे, अक्षय ठाकूर, जनार्दन कुंभार, नवनाथ सुरकुटे, धनराज पाटील, रमेश कुंभार, गोविंद विभुते, श्रीकांत कुंभार, महेश नावंदर, दीपक बावणे, ज्ञानेश्वर पवार, पप्पू घोलप, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत ठोंबरे, स्नेहलता अग्रवाल, मनीषा सुरवसे, पायल चांडक, रेणू शर्मा, ज्योती ठोंबरे,
अविराजे निंबाळकर, लाला पटेल ,अजित नाईकवाडे, विलास भोसले, शैलेश भोसले, बापू चव्हाण, सचिन मस्के, सुरेश चव्हाण, आरफात खान, आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *