• Thu. Feb 5th, 2026

निलंग्यात युवक काँग्रेसतर्फे ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ साजरा

Byjantaadmin

Sep 19, 2025

पकोडे विकून मोदी सरकारच्या अपयशाचा निषेध

निलंगा:- लातूर युवक काँग्रेसच्या वतीने निलंगा युवक काँग्रेस टीमतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकोडे विकून हा आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन लातूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी अजय चिकारा व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती अजित नाना माने, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश लहू म्हेत्रे व निलंगा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले.

प्रदेश सचिव महेश म्हेत्रे म्हणाले, “दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. मात्र आज बेरोजगारी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. नोटबंदी, जीएसटी, बँका-रेल्वेचे खासगीकरण यामुळे उद्योगधंदे बंद पडले. जीडीपी कोसळला आणि देशाची आर्थिक कोंडी झाली. यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे.”शहराध्यक्ष मुजीब सौदागर म्हणाले, “मोदीजींना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, परंतु त्यांनी दिलेल्या दोन कोटी रोजगाराच्या आश्वासनाचे काय झाले? उलट त्यांनी युवकांना ‘पकोडे विकून रोजगार मिळवा’ असा सल्ला दिला होता. आज आम्ही तोच मार्ग अवलंबला आहे.”या कार्यक्रमास अक्षय पाटील, आवेज शेख, शाहनवाज पटेल, पाशा बागवान, सबदर कादरी, माजीद शेख, असलम मणियार, नासेर चौधरी, निजाम हाश्मी,सज्जाद सय्यद ,अरबाज बागवान यांच्यासह युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *