ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपाला नाकारले :भाजपाचा दावा बिनबुडाचा-अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा (प्रतिनिधी):-निलंगा तालुक्यातील ६८ गावाच्या झालेल्या ग्रामपंचायत निवणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४१ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात आठ व देवणी तालुका मध्ये सहा ग्रामपंचायत मध्ये यश संपादन केले असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अनेक ठिकाणी विजय संपादन केला आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेले दावे खोटे असून आमच्या पक्षाचा वतीने जे पॅनल प्रमुख म्हणून जबाबदारी घेऊन गावामध्ये समविचारी जनतेला सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धर्मनिरपेक्ष विचार घेऊन निवडणूक लढवली. व त्यामध्ये घावघवीत यश संपादन केले आहे. या करिता मी स्वतः लक्ष्य देऊन निवडून सरपंच व सदस्यांचे हमीपत्र घेतले आहे काही मुद्यावर चर्चा करावी हा मुख्य हेतु ठेऊन आमच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यासमवेत माहितीस्तव मी आपणा समोर पत्रकार परिषद आयोजित केली आहे. असे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले. खरे पहिले तर ग्रामपंचायतीची निवडणूक हि पक्षाच्या चिन्हावरती लढवली जातनाही परंतु महाराष्ट्रात व आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात जे काही दावे-प्रतिदावे करत आहेत. ते एकदम चुकीचे आहेत. जर त्यांना पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची असेल तर आमचे त्याना जाहीर आव्हान करतो कि येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कुण्या पक्षाच्या किती जागा? हे चित्र स्पष्ट पणे दिसून येईल तसेच,
आपल्या शहरालगत असलेल्या दापका ग्रामपंचायत निवडणुकीत धनशक्ती व दडपशाहीच्या जोरावर जातीयवाद करून बाहेरील गुंडशाहीचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. हे जग जाहीर आहे व येथील जनतेने पहिले आहे. खरे सांगायचे तर निवडणुकी नंतर सगळे काही विसरून विकास कामाकडे पक्ष न पाहता काम केले पाहिजे परंतु विद्यमान आमदार कांग्रेस पक्षाच्या विचाराचा ग्रामपंचायत कडे जाणून बुजून आमदार काहीच मदत करत नसतात, दापका हे गाव झपाट्याने वस्ती व नगरी च्या रूपाने वाढत आहे नागरी सुविधा देण्याऐवजी पक्षीय राजकारण करतात. त्यांनी आमदार निधी मधून दापका ग्रामपंचायतला का मदत केली? हे जाहीर सांगावे. त्यांच्या अश्या पक्षपाती राजकारणाला दापक्याच्या जनतेने काल झालेल निवडणुकीत स्पष्टपणे झडकारले आहे. मी कधीच ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला जात नसतो, विरोधकांनी अफवा पसरविल्या मुळे मला जावे लागले. असे ही अशोकराव पाटील म्हणाले.
अशीच काही परीस्थिती निलंगा शहरामध्ये बघावयास मिळते. अनेक खोटे आश्वासन देऊन बोगस गप्पा मारतात त्यांना जनतेने ओळखले असून येण्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कांग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुका लढविल्या जातील. निलंगा तालुका हा सतत स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिलेला आहे, हे ग्रामपंचायतच्या निवडणुकीवरुन दिसून आले आहे बऱ्याच ठिकाणी भाजपा पक्षामध्ये धुफळी निर्माण झाली असून निलंग्याच्या आमदार विरुद्ध औसाचे आमदार असे गट निर्माण झाले असून औसा मतदार संघात २९ ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंबर एक आहे. यापुढे तालुक्यातील औसा मतदार संघात असलेल्या ६४ गावाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या भागातील कार्यकर्त्यांना वळ पक्ष मजबुती बरोबरच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आदरणीय दादासाहेबाच्या विकासाचा वारसा घेऊन लवकरच विधानसभा मतदार संघात आमचे नेते श्री. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत त्या प्रमाणे निलंगा विधानसभा जोडी (दादासाहेबांच्या विकास कार्याची विकास यात्रा काढणार आहे ) निलंगा तालुका व निलंगा विधान सभा मतदार संघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पक्षाच्या विचारसरनी च्या गावांची नावे खालील प्रमाणे आहेत.
निलंगा तालुका १) दापका २) लिंबाळा ३) पानचिंचोली ४) शिराढोण ५) बोरसुरी ६) हलगरा ७) अनसरवाडा ८) सिंधीजवळगा २) सोनखेड १०) गुंजरगा११) बोटकुळ १२) शेद १३) जाऊ १४) हालसी हत्तरगा १५) चिचोंडी १६) उमरगा हाडगा १७) हासोरी खुर्द १८) मसलगा १९) माकणी २०) शिर्डी (ह) २१) भंगार चिंचोली २२) सिंदखेड २३) कलांडी २४) मिर्गन हाळी २५) मदनसुरी २६) जेवरी २७) हनुमंतवाडी (आनंदवाडी) २८) धानोरा ९) औंढा ३०) अंबुलगा (बु.) ३१ मन्थपुर ३२) तांबाळा ३३) हाडोळी ३४) चिलवंतवाडी ३५) ममदापूर ३६) येळनूर ३७) भूतमुगळी ३८) तेलवाड ३९) रामलिंग मुदगड ४०) काटेजवळगा ४१) हालसी तुगाव.
शिरूर अनंत तालुका १) उजेड २) राणी अकुलगा ३) बसना ४) तळेगाव बोरी ५) वांजरखेडा ६) अजनी ७)रापका ८) बेवनाळ.
देवणी तालुका १) बोरूल २) हेळव ३) सय्यदपूर ४) टाकळी ५) बोंबळी ६) वडमुरंबी. विशेष तुपडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये पॅनल आमचे पूर्ण निवडून आलेले आहे परंतु सरपंच सहा मत पराभूत झालेले आहेत, अशी स्तिती राठोडा ग्रामपंचायत ची आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील,माजी नगराध्यक्ष हमीद शेख, ,दयानंद चोपणे, अमोल सोनकांबळे उपस्थित होते.