टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने शनिवारी मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 वर्षीय टुनिशा एक म्युझिक व्हिडिओ शूट करणार होती. सेटवरील लोकांनी तिला फासावर लटकलेले पाहून खाली उतरवले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्येपर्यंत टुनिशा पूर्णपणे सामान्य होती आणि 5 तासांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो आणि काही नोट्स शेअर केल्या होत्या.
टुनिशाने कतरिना कैफच्या फितूर या चित्रपटात तिच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अलीबाबा दास्तान ए काबुलमध्ये ती राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. याशिवाय टुनिशाने बार बार देखो, कहानी-2, दबंग-3 यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.
आत्महत्येच्या काही तास आधी पोस्ट शेअर केली होती
तुनिषा शर्माने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘जे आपले पॅशन फॉलो करतात ते कधीही थांबत नाहीत.’