महाराष्ट्र फार्मसीत स्व. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर जीपॅट, नायपर अस्पीरेंट अवार्ड 2025 चे बक्षीस वितरण संपन्न
निलंगा:येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील नामांकित जीपॅट व नायपर 2025 या परीक्षेत यश संपादन केले. या यशवंतांचा संस्था अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी गुण गौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस एस पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत पौळ, प्राचार्य महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा, डॉ.कर्मवीर कदम, प्राचार्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, मोहन नटवे, मुख्याध्यापक महाराष्ट्र विद्यालय निलंगा, 1993 बॅचचे माजी विद्यार्थी श्री रमेश रेड्डी, जनरल मॅनेजर, युनिकॉन फार्मा हैदराबाद, अजित सचान, पॅनासिया हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, हरिद्वार व एन श्रीराम, कन्सल्टंट व कोच, हैदराबाद हे आवर्जून उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. एस एस पाटील यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व संशोधन सुविधांबद्दल, विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरी बाबतचा आढावा सादर केला. स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा पूर्ण उपयोग करून घेण्याचे आवाहन तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जीपॅट ही राष्ट्रीय स्तरावरील पदव्यूत्तर पदवी तसेच पीएचडी व फेलोशिप प्राप्त करण्यासाठी सर्वोच्च परीक्षा आहे तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही भारतातील सर्वोच्च फार्मास्युटिकल संशोधन संस्था आहे, ही संस्था रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मासिटिकल्स विभागाच्या अधिपत्याखाली स्वायत्त संस्था म्हणून कार्य करते. या परीक्षेत महाविद्यालयातून वैष्णव भाग्यवंत, मोरे अर्जुन, बिरादार वैभव,भारती उमा, धुमाळ विशाल, पवार मैथिली, पाटील कृष्णा, मुंडे अनिकेत, पवळे विश्वजीत, रायडे पुंडलिक, अंबाड रवींद्र, लादे नम्रता, स्वामी प्राजक्ता व सुमित गिरी यांनी यश प्राप्त केले. प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख रु.5000, 3000 व 2000, तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे चे समन्वयक प्रा. डॉ. एस व्ही गरड, प्रा. डॉ. शरद उसनाळे, प्रा. डॉ. चंद्रवदन पांचाळ, प्रा. मयुरी गुडले यांनी योग्य नियोजन केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. माधव शेटकर डॉ. संतोष कुंभार, डॉ. रविराज मोरे, डॉ. विनोद उसनाळे, प्रा. सुरज वाकोडे, प्रा. इर्शाद शेख, प्रा.सुजित पवार, प्रा. शिवराज हुंनसनाळकर, प्रा. नंदा भालके, प्रा. प्रीती माकने, प्रा. सानुली पोळकर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंद्रवदन पांचाळ व आभार प्रदर्शन डॉ. एस व्ही गरड यांनी केले.
