ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे सरपंच विजयी हा विकासाला दिलेला कौल
सत्कार सोहळ्यात ९८% सरपंच उपस्थितीने भाजपाचा दावा फोल
सरपंच सत्कार सोहळयात एकूण विजयी झालेल्या ९८% लोकनियुक्त सरपंच उपस्थित
लातूर ग्रामीण व शहर मतदार संघातील काँग्रेसचे ८१ सरपंच ५६० सदस्यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात सत्कार
लातूर दि. २४.
लातूर ग्रामीण व शहर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षाकडून दावे माध्यमात ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्या कितपत सत्य आहेत याचा आज प्रत्यय आला निमीत्त होते शनीवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर ग्रामीण व शहर मतदार संघातील काँग्रेसचे नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील तब्बल ८१ सरपंच तर ५६१ सदस्य उपस्थित होते यावरून लक्षात येईल की विरोधी पक्षाकडून दावे करत आहेत आमच्याच पक्षाच्या जास्त जागा आल्या आहेत मात्र आज जेव्हा सत्कार समारंभ झाला त्यात तुडुंब गर्दी दिसत होती हा विजय काँग्रेसचे लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कार्याचा विचाराचा आहे एकंदरीत आजच्या काँग्रेसच्या सत्कार सोहळ्याने नवनियुक्त सरपंच सत्कार देखणा सरपंचाची मोठी उपस्थिती होती त्यामुळे विरोधी पक्षाकडून दावे केलेले आजच्या सत्काराने फोल ठरले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही जे सत्य आहे ते सत्यच असते याचा प्रत्यय आजच्या सत्कार सोहळ्यात दिसून आला आहे आजच्या सत्कार सोहळ्याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे
*लातूर ग्रामीण व शहर मतदार संघातील बहुतांशी ग्रामपंचायती लोकनेते विलासराव देशमुख दिलीपराव देशमुख यांच्या विचारांने चालतात*
आमदार धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर ग्रामीण व शहर मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे आजच्या सत्कार सोहळ्याचा देखणा कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित असलेले ८१ सरपंच हि काँगेसच्या विचारांची विकासाची पावती असून आगामी काळातही लोकनियुक्त सरपंच सदस्यांना विकासासाठी आवश्यक मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर ग्रामीण मतदार संघातील लातूर तालुका , रेणापूर, औसा व लातूर शहर मतदार संघातील असे एकूण ८१ ग्रामपंचायतीचे सरपंच व ५६१ सदस्य यांचा सत्कार राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमूख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, यशवंतराव पाटील , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, लातूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य नारायणराव लोखंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
*लोकनियुक्त सरपंच यांचा विजय ही विकास कामाची पावती*
जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती
लातूर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे सरपंच सदस्य मोठया प्रमाणावर निवडून आले लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या कार्याची पावती असून आगामी काळातही काँग्रेसच्या विचाराने विकासाच्या विचारांच्या जोरावर आम्ही निवडणुका जिंकू असा विश्वास श्रीशैल्य उटगे यांनी व्यक्त केला
कार्यक्रमास लातूर जिल्हा काँग्रेसचे विविध सेल चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील सुरेश चव्हाण, हरिराम कुलकर्णी प्रवीण सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ राजकुमार पाटील संचालक अनुप शेळके संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, रेणापूर,लातूर, औसा येथील नूतन सरपंच सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
*सत्कार सोहळ्यात मोठी गर्दी*
*भाजपाचा दावा फोल*
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडून जास्तीच्या जागा मिळाल्या असे माध्यमांतून दावे केलेले आजच्या कार्यक्रमातून दावे फोल ठरले आहेत अशी चर्चा करताना उपस्थित सरपंच सदस्य चर्चा करताना दिसून आले ते करेक्ट आहे अशी माहिती उपस्थित लोकनियुक्त सरपंच सदस्य यांनी माध्यमाला बोलताना व्यक्त केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या रामेश्वर गावात काँग्रेसचे लोकनियुक्त सरपंच सचिन कराड यांचा विजय झाला त्यांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी लोकांनी मोठया प्रमाणात टाळ्या वाजवून स्वागत केले