किरकोळ बाचाबाचीतुन एकाची भर चौकात हत्या
निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील औराद शहाजानी येथे बहिणीची सोयरीक मोडल्याच्या कारणास्तव विचारपूस करण्यास गेलेल्या तरुणावर बबलू बागवान यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक मयत व एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहीती सपोनि संदीप कामत यांनी दिली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील अखिल जलील बेलुरे वय 25 वर्षे व त्याचा मित्र बबलू लायक भातांब्रे वय 24 वर्षे हे अखिलच्या बहिणीची सोयरीक मोडल्या कारणास्तव जाब विचारण्यास गेले होते. यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळ विक्रीचा व्यवसाय करणारा बबलू महेताबसाब बागवान वय 25 वर्ष याच्याकडे सायंकाळी 6.30 वाजन्याच्या दरम्यान गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बबलू बागवान यांने नारळ छीलन्याच्या हत्याराने अखिल व भातांब्रे यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात अखिल व भातंब्रे जखमी झाले. अखिल यास पुढील उपचारासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी उपचारापूर्वीच निलंगा येथील डॉक्टरानी अखिल यास मयत घोषित केले. तसेच भातांब्रे बबलू यास येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. आरोपी देखील जखमी असल्याने उपचार चालु आहेत.याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु असल्याचे सपोनि संदीप कामत यांनी सांगितले .